अध्यक्षपदी श्री. दत्तात्रय साखरे व उपाध्यक्षपदी श्री राजेंद्र गणपती माळी यांची एकमताने निवड.
उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- शिवप्रसाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. त्यात अध्यक्षपदी श्री. दत्तात्रय साखरे व उपाध्यक्षपदी श्री राजेंद्र गणपती माळी यांची एकमताने निवड करण्यात आली.
सांगली येथील शिवप्रसाद नागरी सहकारी पत संस्था मर्या. सांगली या संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिकनिवडणूक बिनविरोध झाली. सदर संस्थेच्या सन २०२३-२०२४ ते २०२७-२०२८ या साला करीताच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. सदर निवडणूक एकूण ११ सदस्यांच्या निवडीसाठी होती. सदर निवडणूक बिनविरोध पार पडली.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. एस. एस. बोगार, सहकारी अधिकारी वर्ग-२, उपनिबंधक सहकारी संस्था, मिरज यांनी दिली.
निवडणूक अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या नवनिर्वाचित कार्यकारीणी मंडळाच्या पहिल्या सभेमध्ये संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली त्या सभे मध्ये संस्थेच्या नविन संचालक मंडळा मधून अध्यक्षपदी श्री दत्तात्रय तुकाराम साखरे, मिरज व उपाध्यक्षपदी श्री. राजेंद्र गणपती माळी, सांगली सर्वानुमते यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेच्या नविन इतर संचालक मंडळामध्ये उद्योजक श्री. रंगराव कृष्णाजी इरळे (दाजी), सांगली, श्री. एम. के. माळी, नरवाड, श्री. राजेंद्र नारायण व्हरकल, मिरज, श्री. उदय शिरीष माळी, सांगली, श्री सुरेश गणपतीएकुंडे, मणेराजुरी, श्री. उत्तम सदाशिव आठवले, सांगली श्री. विलास विठोबा शेजूळ, सांगली व महिला सदस्यामध्ये सौ. सुमन आप्पासाहेब गोडसे, सांगली आणि सौ. वंदना विश्वास माळी, इ. धामणी यांचा समावेश आहे.
या संस्थेची १९९० पासूनची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा संस्थेच्या सर्व सभासदांनी कायम ठेवलेली आहे. सभेच्या शेवटच्या सत्रा मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी श्री.एस.एस. बोगार यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करणेत आला. त्यानंतर नुतन पदाधिकारी व संचालक यांचा सत्कार समारंभ पार पडला. सत्कार समारंभानंतर सत्काराबद्दल पदाधिकारी व संचालक यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून आपले मनोगत व्यक्त केले.