राहुल मसुरे जिवती तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- आज दिनांक 21 ला अतीदुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या जिवती तालुक्यातील आरोग्य वर्धिनी उपकेंद्र पुनागुडा येथे जागतीक योगा दिन साजरा करण्यात आला व कार्यक्रमाला गावातील महीला बालक व वय वृद्ध गावकरी उपस्थित होते व आरोग्य वर्धिनी उपकेंद्र पुनागुडा येथील (CHO) समुदाय आरोग्य अधीकारी कु. विनंतीताई वसंत मसुरे यांनी योगासना बद्दल चे फायदे सांगीतली बदलत्या जिवनशैली व ताण तनाव या वर योगा हे उत्तम पर्याय आहे दररोज किमान 20 मिनीटे तरी आपल्या आरोग्यासाठी द्यावे तसेच बिपी (B.P.) शुगर व मानसिक तनाव यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे योग व योग मन व शरीर, विचार आणि कृती संयम आणि पुर्तता मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद आणि आरोग्याच्या सर्वांगिन कल्याणाचा दृषीकोन यांचे प्रतीक आहे अनेक मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

