मानवेल शेकले, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- नाशिक येथून एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली. शहरात पाथर्डी परिसरात असलेल्या एका पेट्रोल पंपवरील महिला कर्मचाऱ्यावर एका अज्ञात व्यक्तीने तलवारीने सपासप वार केले त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पाथर्डी परिसरात एक पेट्रोल पंपावर एक महिला काम करत असून तिच्यावर धारधार तलवारी सारख्या शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ही महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाली असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना नाशिकच्या पाथर्डी गावाजवळील वडनेर रोड येथील जाधव पेट्रोलियम पंपावर घडली आहे. आज दुपारच्या सुमारास एक अज्ञात व्यक्तीने कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला करत पळ काढला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
दरम्यान हा धक्कादायक प्रकार पाथर्डी गाव शेजारील एका जाधव पेट्रोल पंप जाधव नामक पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या झाल्याने शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही महिला गेल्या अनेक दिवसांपासून या जाधव पेट्रोल पंपावर काम करत आहे. आज दुपारच्या सुमारास महिला कर्मचारी कार्यरत असताना अचानक अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने या महिलेवर सपासप वार केले. यावेळी तिने प्रतिकार करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र अज्ञात इसम वार करत होता. काही वेळानंतर त्याने पळ काढल्यानंतर महिलेला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. इंदिरानगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. भर दिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. हल्ला करणारा संशयित हा महिलेचा ओळखीचा इसम असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. तसेच गेल्या चार महिन्यापासून जखमी महिला पाथर्डी गावाजवळील जाधव पेट्रोल पंपावर काम करत होती. घोटी येथील प्रमोद गोसावी यांचे तिच्याशी दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गेले सहा सात महिन्यांपासून तिने प्रेमसंबंध तोडले होते. याचा राग संशयित आरोपी प्रमोद प्रकाश गोसावी याला आल्याने आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास हल्ला केला.
प्रेम प्रकरणातून हल्ला…
गेल्या चार महिन्यापासून जखमी महिला पाथर्डी गावाजवळील जाधव पेट्रोल पंपावर काम करत होती. घोटी येथील प्रमोद गोसावी यांचे तिच्याशी दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. गेले सहा सात महिन्यांपासून तिने प्रेमसंबंध तोडले होते. याचा राग संशयित आरोपी प्रमोद प्रकाश गोसावी यास आल्याने आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास हल्ला केला. या दोघांमध्ये जुना वाद असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.