उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई हे संवाद दौर्यानिमीत्त पुणे येथील हवेली, शिरुर शहरात आले असता, त्यांचे तथागत ग्रुप हवेली, शिरुरचे तालुका अध्यक्ष स्वप्नील खंडागळे व पदाधिकारी व सदस्यांनच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
या वेळी संदिपभाऊ गवई यांनी भिमा कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभास मानवंदना देऊन, ते वडु येथील संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळी भेट दिली व संभाजी महाराज यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व संघटनेच्या विषयी सविस्तर चर्चा करून तालुक्यातील कामकाजाचा आढावा जाणून घेतला.
तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्त्यांचा व महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्यांनचा सक्षमीकरण व उद्योग उभारणी करण्यासाठी सर्वत्र विभागामध्ये मेळावे घेण्याचे ठरले आहे. यावेळी शिरुर तालुका अध्यक्ष स्वप्नील खंडागळे यांनी सांगितले लवकरच महिला सक्षमीकरण व संघटना वाढिचे कार्य मोठ्या जोमाने सुरू करण्यात येईल..

