पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील एक्सप्रेस हायवे रोडने सरकार मान्य धान्य बेकायदेशीर विक्री करता घेवुन जाणार आहेत अशी बातमी मिळाल्याने एक्सप्रेस हायवे रोडवरती सापळा रचुन सदर ठिकाणी दोन ट्रक धान्य व आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन गु. रं.नं. १६४ / २०२३ जिवनाश्यकवस्तु अधिनियम कलम ३ व ७ प्रमाणे दिनांक २०/०६/२०२३ रोजी सदर इसमा विरुध्द गुन्हा
दाखल आहे.
शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील एक्सप्रेस हायवे रोडवरुन पुणे वरुन मुंबई करता ०२ ट्रक सरकार मान्य धान्य बेकायदेशीर विक्री करता घेवुन जाणार असले बाबत गुप्त बातमी दारा व्दारे माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचुन अतिशय शिताफिने दोन ट्रक ताब्यात घेतलेले आहेत, सदर ट्रकचे नंबर ट्रक नं. एम एच ०९ सी यु-३०४२ ट्रक नं एम एच १२ एच डी ६9899 असे असुन सदर ट्रकची पाहणी केली असता दोन्ही ट्रक मध्ये सरकार मान्य ३५ टन (३५००० किलो) तांदुळ बेकायदेशीर रित्या विक्री करता चाहुन नेत असताना मिळुन आलेला आहे सदर बाबत तहसिल कार्यालय मावळ येथिल पुरवठा अधिकारी यांनी सदर ठिकाणावरील पंचनामा केलेला आहे. सदर गुन्हयामध्ये एकुण २७,६२,४३७/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन सदर गुन्हयामध्ये आरोपीना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी नामे १) राजु नागनाथ केंद्र, वय ३२ वर्षे, रा. गोकुळनगर कात्रज पुणे २) अमोल लक्ष्मण सोळसकर, वय ४२ वर्षे, रा रुहि, ता. कोरेगाव, जि. सातारा ३) सचिन वसंत धुमाळ, वय ३१ वर्षे रा भाडळे, ता. कोरेगाव, जि. सातारा ४) संजय शिवलिंग वाघोलीकर, वय ५४ वर्षे, रा. फ्लॅट नं २० ए विंग, हस्ती पुरम सोसायटी, बिबवेवाडी, पुणे यांना अटक करण्यात आलेले सदर गुन्हयाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ हे करत असुन सध्या आरोपी पोलीस कस्टडी मध्ये आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे सो सह. पोलीस आयुक्त श्री डॉ संजय शिंदे सो, अपर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी सो, पोलीस उप आयुक्त श्री डॉ. काकासाहेब डोळे सो. सहा. पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग, श्री पद्माकर घनवट सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरगाव परंदवडी पो.स्टे. वनिता एस धुमाळ, पोहवा / ४७१ टी.सी. साबळे, पोना / १२३१ एस. बी. घाडगे, पोना / १२५० वाय. जे. नागरगोजे, पोअंम / २२४१ एस. एल. फडतरे व पोअम / २५७६ डी व्ही राठोड यांनी केलेली आहे.

