युवराज मेश्राम, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एक 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या घरी प्रोजेक्ट तयार करून त्याचा प्रयोग करत असताना ज्वलनशील पदार्थांचा भडका उडाल्याने आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे सर्विकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मयत गौरव डाखोडे हा 20 वर्षीय तरुण एक प्रोजेक्ट बनवत होता. त्यात त्यात ज्वलनशील पदार्थांचा भडका उडाला होता. ही दुर्दैवी घटना 16 ऑगस्ट ला घडली होती या घटनेनंतर विद्यार्थ्याला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
मयत गौरव डाखोडे हा नागपुरातील एसएफएस महाविद्यालयातील बीसीएच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. गौरवने एक प्रोजेक्ट तयार करण्यासाठी घरी काही साहित्य घरी आणले होते. गौरव दुपारच्या सुमारास घरात प्रयोग करत होता. हा प्रयोग करत असताना त्याने आणलेल्या साहित्याचा आणि पेट्रोलचा अचानक भडका उडाला. यामुळे त्याच्या कपड्यांना आग लागली आणि यामध्ये तो गंभीरित्या जळला होता. त्यानंतर त्याला तातडीने उपचारकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले. गौरवचे वडील प्रमोद डाखोडे केंद्र तपासणीच्या संबंधित एका विभागात नोकरीवर आहेत. 16 तारखेला घडलेल्या या घटनेनंतर गौरववर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच 19 तारखेला रात्री गौरवाचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गौरव नेमका कोणता प्रोजेक्ट तयार करत होता आणि त्यासाठी कोणते रसायने वापरत होता, आणि हा भडका नेमका कशामुळे उडाला याचा तपास पोलीस करत आहे.