युवराज मेश्राम, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर :- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडविली आहे.
एका घरात घुसून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने शहारात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. नागपूर शहरातील तलमले लेआऊट येथे राहणाऱ्या महेश वाढई हे ड्रायव्हर म्हणून काम करतात. महेश वाढई याच्या घरात घुसून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला आला. मनासारखं जीवन जगता यावं म्हणून महेशच्या पत्नीनेच त्याच्या हत्येसाठी 40 हजारांची सुपारी दिल्याचं उघडकीस आलं आहे.
महेश वाढई हे आपल्या घरात रात्रीच्या सुमारास झोपले असताना त्यांचं डोकं अनओळखी व्यक्तीने चादरीखाली दाबून धरलं आणि दुसऱ्या मारेकऱ्याने महेशच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केला. अचानक झालेल्या हमल्यामुळे महेशने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी पळून गेले. यानंतर महेश वाढईला उपचारकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पतीवर हल्ला होत असताना त्याच्या पत्नीने त्याला वाचवण्यासाठी काहीही हरकत केली नाही त्यामुळे पोलिसानी तपास सुरू केला त्याच्या तपासात असं निदर्शनास आलं की, महेश वाढईच्या पत्नीची वागणूक संशयास्पद दिसून आली होती. महत्वाचं म्हणजे, महेशवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्याच्या पत्नीला कोणतीही इजा झाली नव्हती. मारेकऱ्यांना पकडण्यासाठीही तिनं कोणताच प्रयत्न केला नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी तिची सखोल चौकशी केल्यानंतर, आपणच पतीच्या हत्येसाठी रोहित गावतुरे, महेश गेडाम यांना सुपारी दिल्याचं मिनाक्षीनं कबूल केलं. मीनाक्षीचा स्वच्छंदी स्वभाव आहे आणि यातूनच तिचे तिच्या पतीशी वाद होत होते. यामुळेच महेशचा काटा काढण्यासाठी मीनाक्षीने पतीच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानंतर हे मारेकरी सोमवारी दुपारी साकोलीहुन नागपुरात पोहोचले आणि मीनाक्षीच्या मदतीने तिच्या पतीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.