मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
पुणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आह. रेल्वे पोलिसांच्या कोठडीत नागेश रामदास पवार वय 27 वर्ष, रा. मोहोळ, सोलापूर हा कैदी होता. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी दि. 24 ऑगस्ट रोजी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मृतक नागेश पवार हा सध्या पुण्यातील हडपसर येथे राहत होता पोलिसांच्या मारहाणीमुळेच माझ्या नवऱ्याचा मृत्यु झाला आहे, असा आरोप या वेळी मृताची पत्नी ताई पवार हिने केला. याबाबतआमदार रोहित पवार यांनी सुद्धा विधानसभेत या घटनेची चौकशीची मागणी केली आहे.
मृतक नागेश रामदास पवार हा अनेक चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी होता. म्हणून त्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. तसेच 17 ऑगस्टला त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 25 ऑगस्टपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली होती. त्यादरम्यान पोलिसांनी त्याला मारहाण केली, त्यात तो आजारी पडल्याने पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान बुधवारी 24 ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. मात्र, नागेशच्या मृत्युला रेल्वे पोलिसच जबाबदार आहेत, असा आरोप मृतक नागेशची बायको आणि बहिणीने केला आहे.
मृतक नागेश पवार गुन्हेगार प्रवृत्तीच्या होता यावर चोरी आणि दरोड्याच्या 11 गुन्ह्यांमध्ये तो पोलिसाना पाहिजे होता. त्याला पोलिसांनी अटक केल्या नंतर न्यायालयाने त्याला 17 ऑगस्टला पोलिस कोठडी सुनावली होती. यानंतर 20 ऑगस्ट रोजी त्याला थंडी, ताप आला. यामुळे आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, त्याला फिट येऊन उलटी झाली. डॉक्टरांनी त्याला निमोनिया झाल्याचे सांगितल्यावर आम्ही आयसीयुमध्ये दाखल करत त्याच्यावर उपचार सुरू ठेवले. याच दरम्यान,न्यायालयाने ऑनलाइनच्या माध्यमतातून त्याला पोलिसांनी मारहाण केली का, असे विचारले होते.त्यावेळी मृत आरोपीने नाही, असे सांगितले होते.
आरोपी पोलिस कोठडीत असताना तेथील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले आहे. तसेच इन कॅमेरा पंचनामा केला असता देखील त्यावर मारहाणीचे कोणतेही पुरावे आढळलेले नाही. म्हणून आमच्यावर लावण्यात आलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. उलट आम्ही माणुसकी दाखवत त्याच्यावर सर्वोतपरी उपचार केले, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.