लेखिका – प्रिया मेश्राम
लग्नानंतर सर्व सुखसोयी असूनही, नवरा, कुटुंब अगदी स्वप्नाच्या पलीकडे त्या मुलीला मिळालं असूनही. असं काय कमी पडल.. त्या विषयावर चर्चा करायला पाहिजे. हवं तर भांडून व्यक्त व्हायला पाहिजे. पण समोरच्याला कळेल कस नक्की काय चुकत, काय कमी पडतं…
तिला पुढील शिक्षण घ्यायचं होत, त्यामुळे तिच्या शिक्षणासाठी ट्युशन क्लासेस लावले शिक्षणामुळे बुद्धीचा विकास होतो अस बोलतात पण तिचा शिक्षणाने परिवाराला अंधारमय खाईत नेले. ट्युशन क्लासेस मध्ये तिचं शिक्षकांशी प्रेम सूत जुडल. आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पवित्र नात्याला कलंकित केलं. या प्रेम प्रकरणाची माहिती घरी माहीत झाल्यावर पुन्हा एक संधी संसार करण्याची व मागचं सर्व विसरण्याची संधी दिलीय. पण तरीही ती ट्युशन क्लासच्या शिक्षकांशी सोबत ती पळून जाण्यात यशस्वी झालीय. त्याच्या भावी जीवनाचा बघितलेल्या स्वप्नचा पूर्णत्व चुराडा झाला.
उलट हुंडाबळी, छळ अशी आरोप करून कोर्टात केस टाकले. हा धक्का तो पचवू शकला नाही. प्रवासात हार्डअटॅक ने जागीच मरणं आलें. लाखो पैसा, वेळ, मानसिक त्रास, आरोप वैगेरे सहन करून शेवटी मन खंबीर नसल्याने ते सहन करण्यापलीकडे गेलं आणि एका क्षणात संपून आयुष्य संपलं.
काय कामात आलं?
कष्टाने मिळवलेलं यश, पैसा, प्रसिद्धी, रूप, सौदंर्य, काहीच नाही. वरवर प्रेमात पडून, आवडीचं हाच व्यक्ती मिळावं ही अपेक्षा, यापेक्षाही महत्वाच ते टिकवायला प्रामाणिक, आदर करणारा, जपणारा, लक्ष देणारा, यश गाठताना साथ देणारा, उंच भरारी घेतांना आपल्या सोबत भरारी घेणारा. समजून घेणारा एक जोडीदार हवा असते. तोच / तिचं शेवटपर्यंत साथ देते. बाह्य सौन्दर्य मिटणारच आहे. पण मन सुंदर असेल तर चिरकाल टिकेल.