उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील नवोदित एमबीबीएस करून डॉक्टर बनलेल्या तेजस्वी संजय घाडगे याचं सर्व स्थरावरून अभीनंदन करण्यात येत आहे. डॉ. तेजस्वी संजय घाडगे प्रामाणिकपणे अभ्यास करून डॉक्टर बनल्यामुळे त्याच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. तेजस्वी यांना पुढील वाटचालीसाठी यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या दिलेल्या संदेशानुसार धम्म मार्गावरून जाणारे कुटुंब संजय घाडगे सर व सुजाता घाडगे यांनी आपल्या कन्येला शिक्षणाचे महत्त्व सांगितले व डॉक्टर केले. ही खरोखरच कौतुकास्पद व अभिनंदनीय बाब आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक प्रगतीसाठी दिलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थीनींला मिळालेल्या संधीतुन आज एमबीबीएस ही पदवी नाशिक येथील विद्यापीठातुन घेऊन उत्तीर्ण झाली त्याबद्दल डॉ. तेजस्वी चे खुप खुप अभिनंदन करण्यात आले. या कुटुंबाच्या दृष्टीने व समाजाच्या दृष्टीने ही खूप खूप अभिमानाची व आनंदाची बाब आहे. डॉक्टर होउन समाजाची सेवा करण्याची इच्छा तिने व तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. डॉ. तेजस्वीच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा देऊन हा सत्कार समारंभ संपन्न झाला.

