वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी साधला लाभार्थ्यांन सोबत संवाद.
हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर, दि. 24 जून:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात लोकसेवेकरिता समर्पित केंद्र सरकारच्या जनकल्याणासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना व विकास कामांची माहिती देऊन जन सामान्य सोबत संवाद साधण्या करिता शनिवार, २४ जून २०२३ रोजी सायंकाळी ७:०० वाजता वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंडराजे नाट्यगृह, बल्लारपूर येथे लाभार्थी संमेलन संपन्न झाले.
यावेळी संमेलनात चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ, हरीश शर्मा माजी नगराध्यक्ष बल्लारपूर न.पा, देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष भाजपा प्रदेश सचिव सौ. विद्याताई देवाडकर, भाजपा ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आशिष देवतडे, भाजपा शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह, भाजपा नेते सर्व निलेश खरबडे, शिवचंद दिवेदी, राजु डारी, सौ.रेणुका दुधे, सौ. मिना चौधरी, नगरसेविका सौ. जयश्री मोहुर्ले, सौ पूनम मोडक, सौ सारिका कणकण, सौ सुवर्णा भटारकर, नगरसेवक येलैय्या दासरप, स्वामी रायबरम, महिला आघाडी बल्लारपूर महामंत्री वर्षा सुंचुवार, कांता ढोके, आरती अक्केवार, व समस्त पदाधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी मोदी9@ अभियान समिती, बल्लारपूर चे संयोजक इंजि देवेंद्र वाटकर, सह संयोजक मुन्ना श्रीवास, लाभार्थी प्रमुख श्रीनिवास, किशोर मोहुर्ले, प्रमोद रामिल्ला, सतीश कणकम, मिथिलेश खेंगर, अजहर शेख, यांनी उत्तम जबाबदारी पार पाडली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्या करीता सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन इंजि. देवेंद्र वाटकर यांनी केले व आभार प्रदर्शन किशोर मोहुर्ले यांनी केले.

