करणी सेनेचे प्रमुख अजय सिंग सेंगर यांच्यावर भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्याकडून मारहाण.
राज शिर्के मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पनवेल:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या कारणावरून भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्या कडून करणी सेनेच्या प्रमुखाला भर रस्त्यात चांगला धडा शिकवत मारहाण केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे.
करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांना ही मारहाण करण्यात आली आहे. संबंधित घटना ही पनवेलच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ घडलीय.अजय सिंग सेंगर हे पनवेलच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ असताना त्यांना रस्त्यात अडवत भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यावेळी भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यानी समोर येऊन मारहाण केल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
प्राप्त माहितीनुसार, करणी सेनेचे प्रमुख अजय सिंग सेंगर यांच्यावर भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. सुभाष गायकवाड आणि सागर पगारे या दोघांनी सेंगर यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. करणी सेनेचे प्रमुख अजय सिंग सेंगर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढल्याबद्दल ही मारहाण करण्यात आल्याचं भीमशक्ती संघटनेचे सुभाष गायकवाड आणि सागर पगारे यांनी सांगितलं आहे. तसेच अजय सेंगर यांनी पुन्हा तसं काही वक्तव्य केलं तर पुन्हा चोप दिला जाईल, असा इशारा सुभाष गायकवाड आणि सागर पगारे यांनी दिला आहे.
मारहाण करणाऱ्यांचा नेमका दावा काय? “अजय सिंग सेंगर यांनी दोनवेळा बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे. ते लोकांना भडकवून सांगतात की, आपल्याला संविधानाची गरज नाही. संविधान बदला. आम्ही सर्वांनी या विरोधात पोलीस ठाण्यात मोर्चा नेला होता. पण त्याने दोन वेळा जामीन घेतल्यामुळे तो बाहेर आला”, अशी प्रतिक्रिया सुभाष गायकवाड यांनी दिली.“अजय सिंग सेंगर याने पुन्हा अशी कृती करु नये म्हणून आम्ही भीम सैनिकांनी त्याला चोप दिला आहे. मी खूप आनंदी आहे. अजय सिंगने पुन्हा महापुराषा विषयी गरळ ओकली तर आम्ही या स्टाईलनेच चोप देणार”, असा इशारा सुभाष गायकवाड आणि सागर पगारे यांच्याकडून देण्यात आला आहे.
अजय सिंग सेंगर पनवेल पोलीस स्टेशन मध्ये पोहचले: संबंधित घटनेनंतर करणी सेनेचे प्रमुख अजय सिंग सेंगर हे पनवेल पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. ते घडलेल्या घटनेची तक्रार पोलिसांना देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणी भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया जारी करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

