पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
खंडणी विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या
हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगुन गुन्हा करणाऱ्या इसमांची माहिती काढून, त्यांचे विरुद्ध कडक कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्यानुसार आमचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा पोलीस निरीक्षक उध्दव खाडे व अंमलदार हे दिनांक २४/०६/२०२३ रोजी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढत असताना पोलीस नाईक आशिष बोटके व प्रदीप गोडांबे यांना बातमी मिळाली की, सराईत गुन्हेगार किशोर भोसले व अमित पाटुळे हे कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने, पुनावळे येथील स्मशान भुमी येथे येणार असून, त्यांचेकडे पिस्टल आहे. अशी बातमी मिळाल्याने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी च अंमलदार यांनी सापळा लावून, १) किशोर बापू भोसले वय ३१ रा. पुनावळे गावठाण, ता. मुळशी, जि. पुणे २) अमित दत्तात्रय पाटुळे वय २३ रा. शिंदेवस्ती चौक, रावेत, पुणे यांना ताब्यात घेवुन, त्याचे ताब्यातुन ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे ( राउंड) जप्त करण्यात आले. त्याचे विरुध्द रावेत पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर २६८ / २०२३, आर्म अॅक्ट कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास दरम्यान त्यांनी सदरचे पिस्टल व राऊंड हे अमोल उर्फ धनज्या गजानन मोरगले रा. पुनावळे, गावठाण, पुणे याचे सांगणेवरुन तडीपार आरोपी रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार याचेकडून आणले असल्याचे सांगितले. खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ अमोल उर्फ बनज्या गजानन गौरगले वय ३४ रा. पुनावळे गावठाण, पुणे याचा शोध घेवुन त्यास तात्काळ अटक केली. खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद पवार व सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे यांनी आरोपी अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले याचेकडे सखोल व कौशल्यपूर्ण तपास केला असता, माथाडीचे कामावरुन झालेल्या वादातून ठराविक उद्देश साध्य करण्याचे हेतूने आरोपी अमोल गोरगले याने साथीदारांकरवी पिस्टल व राऊंड आणले असल्याचे निष्पन्न झाले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सपोनि उध्दव खाडे हे करीत आहेत. अटक आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द हिंजवडी व वाकड पोलीस ठाणे येथे दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करणे असे गुन्हे दाखल आहे.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा.डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, मा.वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप- आयुका, गुन्हे, ना. सतिश माने , सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे सहा पोलीस उप-निरीक्षक अशोक दुधवणे, अमर राऊत तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, रमेश मावसकर, किरण काटकर, सुनिल कानगुडे, प्रदीप गायकवाड, रमेश गायकवाड, ज्ञानेश्वर कुन्हाडे, सुधीर डोळस यांचे पथकाने केली आहे…

