राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी मोबा. नंबर 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- मॉन्सून चा पाऊस पडताच जिल्हात खरीप हंगामाला सुरुवातही झालेली आहे. त्यामुळे शेतकरी शेतात बियान्याची लागवड करण्याच्या तयारीला लागला असताना एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. प्रतिबंध असलेल्या बियाणेची विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे.
तालुक्यात प्रतिबंध असलेले चोरबिटी बियाण्यांची लागवडीचा टक्का देखील तालुक्यात वाढल्याचे चित्र आहे. यात तेलंगणा सिमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात परप्रांतीयांची भूमीका संशयास्पद राहिली आहे. अश्यातच एका परप्रांतीय व्यक्तीवर बुधवारी झालेल्या कार्यवाहीने एकच खळबड उडाली आहे. तालुक्यातील धाबा येथे बूधवारी (दि.२८) ४२००० रुपये किमतीचे चोर बिटी बियाणे जप्त करून कारवाई करण्यात आली. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक नागपूर तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदचे कृषी विकास अधिकारी राजपूत, मोहीम अधिकारी लकेश कटरे, तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, पंचायत समिती कृषी अधिकारी महेंद्र डाखरे यांचे उपस्थित मध्ये करण्यात आली.
या कार्हवाही दरम्यान संशयितांच्या सकाळी राहते घरी ५ वाजेपासून गावात ३ लोकांची झडती घेण्यात आले. त्यामध्ये धाबा गावात आरोपी सापडले आणि कार्यवाही करण्यात आली. आरोपीचे नाव कोटेश्वरराव चिलुकुरी असून ते तेलंगणातील रहिवासी असून धाब्यात वास्तव्याने आहेत. कारवाईने चोर बिटी विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून आरोपीवर धाबा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

