पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका नराधम बापाने बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे येथील वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका नराधम बापाने आपल्याच पोटच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या या घटनेने पुणे हादरलं आहे. संतापजनक बाब म्हणजे आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पीडित मुलीने आपल्या आईला सांगितला. मात्र आईने त्याकडे दुर्लक्ष केलं.
नराधम बापाचा अत्याचार आणि आई याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून या 17 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीने स्वतः पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून वानवडी पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहे आहे.
पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास तिचे वडील दारू पिऊन घरी आले आणि तिच्या रूममध्ये जाऊन तिच्याशी जबरदस्तीने शरारिक संबंध ठेवले. घडलेला हा भयानक प्रकार त्या तरुणीने तिच्या आईला सांगितला. परंतु आईने तिला गप्प बसायला सांगून हा प्रकार कोणालाही सांगायचं नाही असे सांगत धमकी दिली.
ही घटना पीडित तरुणीने तिच्या मित्राला सांगितली तेव्हा तिच्या आईने तिच्या मित्राला देखील धमकावत शांत राहण्यास सांगितले. अखेर पीडित तरुणीने धाडस करून वानवडी पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांसमोर संपूर्ण आपबीती सांगितली. याप्रकरणी वानवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

