पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
युनिट ४ गुन्हे शाखा पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २८/०६/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट ४ कडील पोलीस पथक असे मा. पोलीस निरीक्षक गणेश माने यांचे सुचनान्वये खडकी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अजय गायकवाड, सारस साळवी यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणाहून रात्रीच्या वेळी हॅन्डल लॉक तोडुन दुचाकी चोरुन त्यांच्या नंबर प्लेट काढुन त्या दुचाकी वापरणारे दोघे जण आंध रोड वरिल खडकी रेल्व स्टेशन जवळ थांबले आहेत.अशा मिळालेल्या बातमी प्रमाणे मा.पो.नि.गणेश माने यांनी बातमीच्या ठिकाणी जाऊन कारवाई करणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले त्याप्रमाणे युनिट-४ कडील पोलीस स्टाफने सापळा रचुन एका नंबर प्लेट नसलेल्या होन्डा अॅक्टीव्हा स्कुटर वरील दोन संशयित १) रोहन ऊर्फ बॉन्ड बाळ्या अशोक महेत्रे, वय वर्षे, रा. शनिनगर, दत्तनगर, जांभुळवाडी रोड, कात्रज पुणे, २) अक्षय ऊर्फ वाश्या भारत वाघमारे वय २३ वर्षे, रा. अप्पर इंदीरानगर, व्हिआयटी कॉलेजजवळ, बिबवेवाडी, पुणे यांना चोरीच्या स्कुटर सह ताब्यात घेतले. त्यांचेकडे अधिक तपास करता दोघांनी मिळून पुणे शहरात रात्रीच्या वेळी बुधवार पेठ बिबवेवाडी कात्रज, उन्ड्री स्वारगेट दांडेकर पुल येथे वाहने चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्यांना अधिक विश्वासात घेऊन त्यांचे ताब्यातून एकुण ३ होंडा अॅक्टीव्हा २ डीओ व १ हिरो
सलेन्डर मो. सायकल अशा एकुण ३,१०,०००/- रुपये किंमतीच्या ६ दुचाकी जप्त करुन (१) फरासखाना पोलीस ठाणे गु.र.नं. ९९/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ (२) स्वारगेट पोलीस ठाणेगु.र.नं. १६७/२०२३ भा. द. वि. कलम ३७९ (३) पर्वती पोलीस ठाणे गु.र.नं. १७१ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९,३४ (४) भारती विद्यापिठ
पोलीस ठाणे गु.र.नं.४०९/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ (५) कोंढया पोलीस ठाणे गु.र.नं.६३२ /२०२३ भा. द. वि. कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हे उघडकीस आले आहेत. होंडा अॅक्टीव्हा एम.एच.१२ एच.टी. ५५२० या गाडीचे मालकाचा शोध घेत आहोत.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल हा पुढील कारवाई कामी फरासखाना पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री. संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. सतिश गोवेकर, पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस फौजदार महेंद्र पवार युनिट-४ कडील पोलीस अंमलदार शितल शिंदे, अजय गायकवाड, प्रविण भालचिम, सारस साळवी, मनोज सांगळे, स्वप्निल कांबळे यांनी केली आहे.

