पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
शिवाजी नगर पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या संकल्पनेतुन पुणे शहरामध्ये सायंकाळी पोलीस स्टेशन हददीत पायी गस्त नियोजीत करण्यात आलेली आहे.
त्याअनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, प्रताप साळवे, पोलिस उप-निरिक्षक, विशाल शिंदे, ग्रेड पोलीस उपनिरिक्षक, सावंत, सपोफौ भिवरे व पोलीस अंमलदार हे पोलीस ठाणे हददीत पायी गस्त करीत असताना पोउनि साळवे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोल्हापुर येथील एक रेकॉर्डवरील पाहीजे असलेला आरोपी इराणी वस्ती येथे आलेला आहे…
सदर बाबत वरीष्ठांनी पाहिजे आरोपी यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईचे तोंडी आदेश दिले. त्याप्रमाणे खाशाबा जाधव ग्राऊंड, इराणी वस्ती, शिवाजीनगर येथे बातमीप्रमाणे एक इसम संशयास्पदरित्या पायी पेट्रोलींग दरम्यान मिळुन आला. त्याला शिताफीने ताब्यात घेऊन, त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांने त्याचे नाव सादिक आली. आर. सरगिरो ऊर्फ दादु ऊर्फ राजा भवानी ऊर्फ रझा हुसेन इराणी वय २८ वर्षे, रा. इराणी वस्ती, राजा अली जन्नतनगर, ता. धारवाड, विजयागिरी, जि. हुबळी, राज्य-कर्नाटक असे सागितले. नमुद इसम हा शाहुपुरी, जि. कोल्हापुर पोलीस स्टेशन येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्यास शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे येऊन त्याची अधिक चौकशी केली असता, तो शाहुपुरी पोलीस स्टेशन, कोल्हापुर येथील गुन्हा रजि नं. १५६ / २०२१. भा.द.वि. ३९२.३४ मधील पाहिजे अरोपी असल्याचे समजले. त्याबाबत पोलीस निरीक्षक, शाहुपुरी पोलीस स्टेशन, कोल्हापुर व पोलीस निरीक्षक, एल. सी.बी. कोल्हापुर यांच्याशी संपर्क साधुन त्याची खातरजमा केली असता तो नमुद गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याची खात्री झाली आहे. त्याप्रमाणे त्यांच्याशी समन्वय साधुन सदर आरोपीस एल. सी.बी. कोल्हापुर यांचे आरोपी पार्टीचे ताब्यात वैदयकिय तपासणी करुन सुस्थीतीत देण्यात आलेला आहे…
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उपायुक्त, परि-०१, पुणे शहर श्री. सन्दीपसिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे शहर श्री वसंत कुंवर, शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, प्रताप साळवे, पोलिस उप निरिक्षक विशाल शिंदे, ग्रेड पोलीस उप- निरिक्षक सावंत, सपोफो भिवरे, पोलीस अंमलदार, राजपुत, सोनवणे, साठे, शिंदे, कांबळे यांनीकेलेली आहे.

