Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

नागपुर वरून पुणेला जाणाऱ्या खाजगी बसला भीषण अपघाता नंतर भीषण आग, 25 प्रवाशी जाळून खाक. व्हिडिओ आला समोर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 1, 2023
in अपघात, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर वरून पुणेला जाणाऱ्या खाजगी बसला भीषण अपघाता नंतर भीषण आग, 25 प्रवाशी जाळून खाक. व्हिडिओ आला समोर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा भागातील घटना आहे. बसमध्ये 33 प्रवाश्या पैकी 25 लोकांचा मृत्यू.

सीमा सुरूशे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विदर्भ:- एक दुःखद घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे. नागपूर येथील प्रवाशी घेऊन पुण्याला जाणाऱ्या खासगी खाजगी बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. खांबाला धडकून उजव्या बाजूच्या संरक्षक कठड्यावर आदळलेली बस आधी डावीकडे पलटी झाली, नंतर काही क्षणातच बसला भीषण आग लागली, या आगीत बसमधून प्रवास करणाऱ्या 25 प्रवाशांचा होरपळून जाळून कोळसा झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघात 8 प्रवासी थोडक्यात बचावल्याचं समोर आलं आहे.

हा अपघात समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा परिसरात झाला आहे. या खाजगी बसमध्ये एकूण 33 नागरिक प्रवास करत होते. यापैकी 25 प्रवाशांचा या भीषण आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर चालकासह आठ जण बसच्या खिडकीच्या काचा फोडून बाहेर पडले. म्हणून त्यांचा जीव वाचला.

नागपुर वरून पुणेला जाणाऱ्या खाजगी बसला भीषण अपघातानंतर भीषण आग, 25 प्रवाशी जाळून खाक.

समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा भागातील घटना आहे. बसमध्ये 33 प्रवाश्या पैकी 25 लोकांचा मृत्यू. pic.twitter.com/Zf2HHm1JQ8

— Maharashtra sandesh news (@Maharashtrasan7) July 1, 2023

या बस अपघातात 25 प्रवाशाचा मृत्यू झाला असून आता अपघातग्रस्त बसमधील मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. यासाठी डीएनए टेस्ट शिवाय पर्याय नसल्याचे पोलीस यंत्रणेचे म्हणणे आहे. ही बस नागपूरहून निघाल्यामुळे खाजगी बस बुकिंग पॉईंट वरून ऑफिस मधून मृतांची नावं मिळण्यासाठी पोलीस यंत्रणा व प्रशासन प्रयत्नशील आहे.

दुसरीकडे, अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांचे मोबाईल देखील जळून खाक झाले असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय किंवा आप्तांशी संपर्क होणे कठीण होत आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळमधील बहुसंख्य प्रवासी प्रवास करत होते.

अपघात कसा झाला? अपघातग्रस्त बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस नागपूरहून पुण्याकडे निघाली होती. बसमध्ये एकूण 33 जण प्रवास करत होते. समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा रोडवर आधी बस एका खांबाला धडकली, नंतर ती उजव्या बाजूला असलेल्या संरक्षक दुभाजकावर आपटली आणि पलटी झाली. बस उलटताच डिझेलच्या टाकीने पेट घेतल्यामुळे काही क्षणातच संपूर्ण बसला आग लागली. रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. ही बस एका बाजूला कोसळल्यामुळे दरवाजा उघडण्याचा मार्ग बंद झाला होता. रात्रीच्या वेळी बसमधील प्रवासी गाढ झोपेत असल्यामुळे अपघातानंतर लगेच समजून बाहेर निघेपर्यंत उशीर झाला होता. जवळपास २५ जणांचा जखमी होऊन, किंवा आगीत होरपळून अथवा धुराने गुदमरुन अंत झाला. ज्या प्रवाशांना संधी मिळाली, त्यांनी बसच्या खिडकीच्या काचा फोडून बाहेर उडी घेतली.

Previous Post

शिवाजीनगर पोलीस स्टेशन तपास पथकांची उत्तम कामगिरी पायी गस्त दरम्यान पाहिजे आरोपीस केले जेरबंद

Next Post

वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकांची पुन्हा एकदा दमदार कामगीरी ! सोन साखळी खेचणारे सराईत “जबरी चोर” केले जेरबंद

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकांची पुन्हा एकदा दमदार कामगीरी ! सोन साखळी खेचणारे सराईत “जबरी चोर” केले जेरबंद

वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकांची पुन्हा एकदा दमदार कामगीरी ! सोन साखळी खेचणारे सराईत "जबरी चोर" केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In