युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन कळमेश्वर:- येथील ब्राह्मणी फाटा येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सावनेर विभाग बसचा थांबा आहे परंतु गेल्या अनेक दिवसापासून बस चालक वाहक या थांब्यावर बस थांबवत नसल्याने प्रवासाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे परिणामी प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने त्यांना जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे आणि शासनाचा महसूल बुडत असल्याने सरकारचे मोठे नुकसान होत आहे.
सावनेर कळमेश्वर मार्गावर ब्राह्मणी फाटा येथे बस निवारा नसल्याने प्रवासी शाळकरी मुले कामगार सामान्य नागरिक उन्हात पावसात रस्त्यावर उभे राहून बसची प्रवासाकरता वाट बघत असतात असे असताना बस चालक व वाहक बस थांबा असून सुद्धा तिथे बस थांबवत नसल्याने प्रवाशांना त्यांच्या कामापासून मुकावे लागत आहे असून त्रास सहन करावा लागत आहे ही बाब अन्यायकारक असल्याने शेतकरी संघटना कळमेश्वर तालुक्याच्या वतीने सावनेर आगार येथील आगार व्यवस्थापक गुणवंत तागडे यांना बस तांब्यावर थांबविण्याकरिता आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याकरिता लेखी निवेदन नुकतेच देण्यात आले आहे.
यावेळी निवेदन देताना जिल्हा अध्यक्ष संजय चौधरी, तालुका अध्यक्ष महेंद्र, सातपुते मनीष शेंडे, मुरलीधर ठाकरे, दीपक निंबाळकर, जीवन बागडे आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

