Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे: विविध बँकेत जाऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा लष्कर पोलीस पथकाने केला स्पर्दाफास, 3 आरोपी अटक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 1, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे: विविध बँकेत जाऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा लष्कर पोलीस पथकाने केला स्पर्दाफास, 3 आरोपी अटक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे :- लष्कर पोलीस स्टेशनचे तपास पथकाने बँकेमध्ये कॅश भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवुन तसेच बँकेतील स्लिप भरण्यास मदत करण्याचा बहाणा करुन महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यात फसवणुक करणाऱ्या चोरास केली अटक.

नितिन रामचंद्र पवार पुणे यांनी दि.13 जून रोजी दुपारी 3.00 वाजताच्या दरम्यान इंडसइंड बँक पुणे (कॅम्प ब्रांच) मध्ये त्यांचे मॅनेजर येशुदास मैकेलेरी रा.देहुरोड यांनी दिलेले इनकम टॅक्सचे 4 चेक, ड्रायव्हर ज्ञानदेव लडकत यांचा पगाराचा चेक, कॅश 3 लाख रुपये काढण्याचा चेक असे सदरील बॅकेत चेकचा भरणा करुन त्याच्या पोहच घेतल्या व कॅशियर कडुन 3 लाख रुपयांची कॅश काढुन घेतली. कॅश काऊंटर जवळ उभा असणारा आरोपी दिपककुमार ओमप्रकाश मेहंगी वय 47 वर्षे धंदा ड्राव्हींग रा. हाऊस नंबर 120, गल्ली नंबर 105, देशराज करुणी, पानीपत, हरीयाणा हा बँकेचाच माणुस आहे असे फिर्यादी यांना वाटले व तोही बँकेचा कर्मचारी असल्याचे फिर्यादी यांना भासवुन फिर्यादी यांनी बँकेतुन काढलेल्या रक्कम बाबत त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांचे कडील पेनने लिहीलेल्या व रंग लागलेल्या 500/- रु.दराचे दोन बंडल घेऊन कॅशियर कडुन बदलुन देतो असे सांगितल्याने फिर्यादी यांनी त्यांच्याकडील कडील 500/- रु.दराच्या दोन बंडल बदलुन आणण्या करीत दिले. सदर आरोपीने काउंटरकडे जाताना एका बंडलमध्ये 99 नोटा आहेत.0मोजुन घ्या असे सांगितल्याने फिर्यादी हे त्यांचेकडील नोंटाचे बंडल मधील नोटा मोजत असताना यातील आरोपी दिपक कुमार ओमप्रकाश मेहंगी याने 500/- रु.दराचे दोन बंडल कॅशियर कडुन बदलुन न घेता परस्पर बँकेतुन निघुन गेला असा फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन स्वताःच्या फायद्याकरीता फिर्यादी कडील 1 लाख रुपयांचा अपहार करुन फसवणुक केली. म्हणुन फिर्यादी याने पोलिसात तक्रार दाखल केली होती.

या गुन्हयाचा शोध लष्कर पोलीस स्टेशन येथे दि. 13 जून रोजी गुन्हा रजि नंबर 126/2023 भादवि कलम 406, 420 अन्वये नोंद करून वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने तपास पथकामार्फत तपास सुरु होता. त्याबाबत सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातुन सदर आरोपीचा शोध घेत असता आरोपी हा द क्रिश लॉज नरपतगिरी चौक पुणे येथे थांबल्याचे निष्पन्न झाले होते. नमुद क्रिश लॉज चे मॅनेजर मोहमद इम्रान शेख यांचेकडे सदर आरोपीचे अपराध करते वेळचे सीसीटीव्ही फुटेज दाखवुन विचारपुस केली असता त्याने उपलब्ध रजिस्टर्स रेकॉड वरुन सदर आरोपीचे मोबाईल नंबर, आधार कार्ड डिटेल्स वरुन आरोपी हा दिपककुमार ओमप्रकाश मेहंगी असल्याचे निष्पन्न झाले दि. 26 जून रोजी 8.00 वाजता सदर आरोपीच्या मिळालेल्या मोबाईल नंबरच्या तांत्रिक विश्लेषनाद्वारे तो अहमदनगर वरुन पुण्यातील सोमवारपेठ व रास्तापेठ पुणे परिसरात आला असल्याचे समजले. त्यानंतर पोहवा कदम, पोहवा शिंदे, पोहवा मेंगे, पोना मांजरे, पोना कोळी असे मिळून मिळालेल्या लोकेशन वर खाजगी वाहनाने रवाना झाले. उपलबघ लोकेशनच्या आधारे सोमवारपेठ व रास्तापेठ पुणे परिसरतील लॉजेस चेक करीतअसताना लॉज नामे सुरज क्लासीक हॉटेल ॲन्ड लॉजचे रजिस्टर्स चेक केले असता सदर आरोपी वास्तव्यास असल्याचे दिसुन आले. त्यानंतर पोलिसांनी लागलीच सोबत स्टॉफ व लॉज चे मॅनेजर याच्या मदतीने त्यास रुम नं. 303 यातुन दि. 27 जून रोजी चे 1.30 वाजताच्या सुमारास आरोपीस व त्याचा साथीदार सुनील रामप्रसाद गर्ग यास ताब्यात घेऊन मुख्य आरोपी दिपक याच्या कडे विचारपुस केली असता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यानी पुण्यात विविध बँकामध्ये कॅश भरण्यासाठी येणाऱ्या लोकांची दिशाभुल करुन व हातचालाखीने वेगवेगळ्या ठिकाणी फसवणुक करुन पैसे चोरल्याचे कबुली दिली. त्याच्या सोबत असणारा त्याचा मित्र सुनील रामप्रसाद गर्ग वय 36 वर्षे धंदा- रिक्षा चालक रा.417 गली नं 15 देशराज कॉलनी पानीपत हरियाणा याचेकडे चौकशी केली असता त्याने दिपक ओमप्रकाश कुमारच्या मदतीसाठी मी वदिपकचा भाऊ सुरजकूमार ओमप्रकाश मेहंगी वय-39 वर्षे धंदा- रिक्षा चालक रा. मकान नं. 120 खेडागली देशराज कॉलनी हरीयाणा पानीपत आम्ही दोघे मदत करायचो असे सांगितले.

तेव्हा पोलिसांनी अधिक चौकशी कामी दिपक व सुरजकुमार या दोघांना घेऊन लागलेच स्टॉफ सहीत ताब्यात घेतले यावेळी पोलीस तपासात राज्यातील अनेक भागातील नागरिकाची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच दिपक याचेकडे त्याच्या भावाबद्दल चौकशी केली असता भाऊ सूरजकुमार ओमप्रकाश हा विमानाने दिल्ली ला जाणार असल्याचे सांगितले. लागलीच लष्कर पोलीस स्टेशन येथून शासकीय वाहनाने लोहगाव विमानतळ येथे जाऊन सीआयएसएफ फोर्स यांचे मदतीने आरोपीस लोहगाव विमानतळ येथे आतमध्ये जाऊन ताब्यात घेतले. त्यास ताब्यात घेऊन लष्कर पोलीस स्टेशन येथे आणून त्यास विश्वासात घेऊन गुन्हयाबाबत विचारले असता दिपक सोबत यापुर्वीही पुण्यात वेगवेळ्या बँकेत लबाडीने कॅश चोरल्याचे सांगतिले व तिघांनी मिळुन सदर गुन्हे केलेचे कबुल केले. तसेच त्यांना आणखीन विश्वासात घेऊन अधिकची माहिती प्राप्त केली असता तिघांनी मिळुन दाखल गुन्हा केलेचे आमची खात्री झाल्याने तिन्ही आरोपीतांची वैदयकीय तपासनी करुन दाखल गुन्हयात दि.27 जून रोजी रात्री 10.00 वाजता अटक करण्यात आली.

यावेळी आरोपीवर लष्कर पोलीस स्टेशनमध्ये भादवि च्या 406, 506, 34, 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी आरोपींना न्यायालयात हजर केले असता दाखल गुन्हयातील आरोपी कडुन अधिक तपास करुन त्याने आणखी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर कोठे कोठे पैशांचा अपहार केला आहे त्याबाबत तपास करणेकामी त्याची पोलीस कस्टडी रिमांड वाढवुन घेण्यात आला. सदरची कामगीरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे प्रविणकुमार पाटील. पोलीस उप आयुक्त स्मर्ताना पाटील, परि. २, मा. सहा. पोलीस आयुक्त आर राजे, लष्कर विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शशिकांत चव्हाण, पोलीस निरिक्षक (गुन्हे) प्रियंका शेळके, सहा पोलीस निरिक्षक शितलकुमार गायकवाड, यांचे नेतृत्वाखाली, तपास पथकातील अधिकारी महेंद्र कांबळे पोलीस उप निरीक्षक व अंमलदार पो.हवा. महेश कदम, पो.हवा. विलास शिंदे, पो.हवा. अतुल मेंगे, पो. हवा. मंगेश बो-हाडे, पो.ना सचिन मांजरे, पो. ना समिर तांबोळी, पो.ना गणेश कोळी पो. शि. सागर हराळ, पो. शि. लक्ष्मीकांत कांबळे, पो. शि. लोकेश कदम, लष्कर पोलीस स्टेशन यांनी केली आहे.

Previous Post

ब्राह्मणी फाटा येथे थांबा सुरू असतांना बस थांबता थांबेना, आगार व्यवस्थापकाला शेतकरी संघटनेचे लेखी निवेदन

Next Post

चंद्रपुर व बल्लारशाह आरपीएफ की संयुक्त कार्यवाही में सौ करोड़ की धोखधड़ी कर ट्रेन से भागता आरोपी जेरबंद.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चंद्रपुर व बल्लारशाह आरपीएफ की संयुक्त कार्यवाही में सौ करोड़ की धोखधड़ी कर ट्रेन से भागता आरोपी जेरबंद.

चंद्रपुर व बल्लारशाह आरपीएफ की संयुक्त कार्यवाही में सौ करोड़ की धोखधड़ी कर ट्रेन से भागता आरोपी जेरबंद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In