Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

ऊर्जेचा अखंड स्त्रोत सामाजिक कार्यकर्त्या सारिकाताई शिंदे, अनेकांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व..

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 1, 2023
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय, साहित्य /कविता
0 0
0
ऊर्जेचा अखंड स्त्रोत सामाजिक कार्यकर्त्या सारिकाताई शिंदे, अनेकांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सीमाताई सुरूशे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन व्यक्ती विशेष:-क्षितिज ज्याचे थांबले नाहीत्याला कसलेच भय नाहीत्याला कसलाच क्षय नाहीअसा काहीसा जिवंतपणाचा स्पर्श लाभलेल्या लख्ख आरस्पानी सारिकाताई शिंदे

फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील प्राण पणाने लढणारी आणि अन्याय अत्याचार अक्षरशः तुटून पडणारी पण शब्द सुमनात अगदी मधुरी वाणी अशी शब्दकळेचं लेणे लाभलेली आयुष्यातल्या प्रत्येक मनुष्याला एक उर्जवान नवी वाट दाखवणारी आणि जीवनाच्या या रहदारीत तितक्याच समरसतेने नव विचाराना आत्मसात करणारी शुद्ध अभिजात आत्मनिष्ठ अशी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याच्या महामेरू आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करणारी असे प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणजेच सारिका ताई शिंदे.

सुजलाम सुफलाम या पुरोगामी महाराष्ट्राला अनेक महापुरुषांनी घडवलं. रक्ताच पाणी करून या उभ्या महाराष्ट्रात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्याचा पाया रचला. त्यात अनेक महिला रणरागिणीनी पण आपले जीवन अर्पण केले. या सर्व महापुरुषाच्या विचार आपल्या जीवनात उतरून अनेकांच्या जीवनात नवी आशा निर्माण करण्याच्या संकल्प करून अनेकांच्या जीवनात आनंदाचे अंकुर फुलविनारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच सारिकाताई शिंदे…

सारिकाताई शिंदे या कधीही आपल्या तत्वाशी तडजोड करत नाही. सामाजिक कार्याचा घेतलेल्या वसा निर्भिड पने आपल्या खाद्यावर घेऊन चालत आहेत. त्यामुळे त्या सामाजिक कार्यात तन – मन – धनाने आपली जबाबदारी पार पाडत आहे.

देवदासी महीलानसाठी कार्य अतुलनीय.… आज मनात खोलवर रुजलेल्या धार्मिक श्रद्धांना बदलत्या परिस्थितीनुसार मूठमाती दिली पाहिजे आणि एकवटून संघर्षही केला पाहिजे. स्वतःच्या फायद्यासाठी देवदासी स्त्रियांच्या शरीराची नासाडी करणारे नराधम याच समाजात आहेत. म्हणून स्वतःचं आयुष्य कसं असावं याचा थोडा जरी डोळसपणे विचार केला तर काही अंशी का होईना पण या जीवघेण्या देवदासी प्रथेस आळा बसू शकेल. आज ठिकठिकाणी संघर्ष होत आहेत. पण कडक कायद्याचीही तितकीच गरज आहे. एकूणच शासनाची आणि समाजाची उदासिनताही याला कारणीभूत आहे. एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांना या जन्मात जरी मिळाला तरी खूप काही त्यांनी मिळवलंय असं म्हणता येईल. त्यामुळे सारिकाताई शिंदे या देवदासी स्त्रियाचा हक्कासाठी लढत आहे. देवदासी स्त्रियांच्या उन्नतीची चळवळ आज एकाकी अवस्थेत आहे. राज्यकर्त्यांमध्ये उदासीन धोरण, लहान वयातच घरच्यांनीच लादलेले उपेक्षेचे जीवन, सतत पत्करावी लागणारी लाचारी, इच्छा असो वा नसो सतत देहावर होणारे अत्याचार हे सर्व निमूटपणे सहन करणाऱ्या देवदासी महिलांचं कार्य मोठं आहे. म्हणून सारिकाताई देवदासी महिलाना न्याय मिळून देण्यासाठी त्या अनेक वर्षांपासून कार्य करत आहे.

साहित्यिक विचारवंत सारिकताई.. सरिकाताई एक उत्तम साहित्यिक तर आहेत पण त्या एक निर्भिड विचारवंत पण आहेत. राज्यात होणाऱ्या अन्याय अत्याचारावर आपल्या रोखठोक वाणीने प्रहार करत आहेत. एका बाजूला तथागत गौतम बुद्धाची शांती आणि दुसऱ्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांतीचे उत्तम संगम घेऊन त्या चालत आहे.

सारिका ताई शिंदे या कृतीशील कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात ते किती सार्थ आहे हे त्यांच्या कामाचा व्याप पाहून नक्कीच लक्षात येते. त्यांनी अनेक आंदोलनात सहभागी होऊन अन्याया विरोधात आवाज बुलंद केला. महिला अत्याचार, सरकारचे जनता विरोधी धोरण, ओबीसी, एससी, एसटी समाजावर होणार अन्याय विरोधातील आवाज बुलंद करत असतात. समाजमन जागृतीसाठी त्या विविध कार्यक्रमात प्रमुख्याने उपस्थित राहतात. सारिकाताई इतक्यावरच न थांबता त्यांनी आपले कार्य अधिक व्यापक पातळीवर चालावे यासाठी अनेक कार्यकर्त्या तयार केल्या. शहरी आणि ग्रामीण स्त्रियाना जोडण्याच्या उद्देशानेही त्यांनी काम केले. स्त्री सक्षमता आणि पुरुषांना बरोबर घेऊन माणूस म्हणून पुढे जाण्यासाठी त्यांनी केलेली धडपड कायम स्मरणात राहील.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा……. प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

सांगली: नवविवाहित पती पत्नीची विष प्राशन करून आत्महत्या, संपूर्ण सांगली जिल्हा हळहळला.

Next Post

नगर पालिकेने सामान्य नागरिकांचा कर(टॅक्स) मध्ये ३५% ने केलेली वाढ तात्काळ रद्द करा. दहा दिवसाचा दिला अल्टिमेटम: अतुल वंदिले

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नगर पालिकेने सामान्य नागरिकांचा कर(टॅक्स) मध्ये ३५% ने केलेली वाढ तात्काळ रद्द करा. दहा दिवसाचा दिला अल्टिमेटम: अतुल वंदिले

नगर पालिकेने सामान्य नागरिकांचा कर(टॅक्स) मध्ये ३५% ने केलेली वाढ तात्काळ रद्द करा. दहा दिवसाचा दिला अल्टिमेटम: अतुल वंदिले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In