संदीप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- कर्मवीर ऍड बाबू हरदास आवळे यांच्या 107 व्या जयंती निमित्ताने बहुजन समाज पार्टी ने आज आवळे बाबु चौकातील ऍड बाबू आवळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच समृद्धी महामार्गावर रात्री झालेल्या भीषण अपघातातील मृतकांना आदरांजली व्यक्त करण्यात आली.
ऍड बाबू आवळे यांनी बाबासाहेबांच्या धम्म दीक्षेला सुप्रीम कोर्टात कायदेशीर मान्यता मिळवून दिली, तसेच दीक्षाभूमीची जागा मिळवण्यासाठी स्वतः आमदार असताना विधानसभेत प्रयत्न केले. यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी म्हणून रिपब्लिकन पार्टी व समता सैनिक दलात कार्य केले, त्यामुळे बहुजन समाज पार्टी ने त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी प्रा. सुनील कोचे, जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, माजी नगरसेवक मो. इब्राहिम टेलर, संजय जयस्वाल, गौतम पाटील, वीरंका भिवगडे, शहर प्रभारी महेश सहारे, चंद्रशेखर कांबळे, युवा नेते सदानंद जामगडे, उत्तर नागपूर विधानसभा प्रभारी योगेश लांजेवार, विधानसभा अध्यक्ष जगदीश गजभिये, तपेश पाटील, परेश जामगडे, स्नेहल उके, विवेक सांगोळे, अमित पानतावणे, राहुल उके, सुनील दरवाडे, सुजाता मेश्राम, राजेश नंदेश्वर, नरेंद्र तांबे, हेमंत शंभरकर, विजय बोरकर आदि प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मृतकांना आदरांजली रात्री समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्याना याप्रसंगी बसपाच्या वतीने सामूहिक आदरांजली व्यक्त करून शासनाने त्यांच्या व जखमींच्या परिवाराला विनाविलंब आर्थिक मदत करावी असेही आवाहन केले.

