हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा (पश्चिम विभाग) अंतर्गत तालुका शाखा राजुरा च्या वतीने दि.०२ जुलै रोज रविवारला “सम्यक बुद्ध विहार” सोमनाथ पूर वॉर्ड, ता. राजुरा येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर व सत्कार सोहोळा चे आयोजन भारतीय बौद्ध महासभा तालुका राजुरा तर्फे करण्यात आलेले होते. या शिबीराचा समारोपीय कार्यक्रम रवीवारला संपन्न झाला.
या शिबिरामध्ये सर्व प्रथम गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आयु.नेताजी भरणे जिल्हा अध्यक्षच्या हस्ते दीप प्रजलित करून त्रिशरण पंचशील घेऊन पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला असंख्य उपासक, उपासिका यांनी सहभाग घेऊन कार्यकर्ता प्रशिक्षण घेतले.
या शिबीरचे उदघघाटन नेताजी भरणे जिल्हा अध्यक्ष यांनी केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुषणाक पेरकावर केंद्रीय शिक्षक चंद्रपूर गायत्रीताई रामटेके शहर अध्यक्षा, केंद्रीय शिक्षिका बल्लारपूर, धर्मुजी नगराळे तालुका अध्यक्ष, किशोर तेलतुंबडे, गजभिये, प्रा. दिनेश घागरगुंडे, मेघाताई बोरकर अध्यक्षा, किरणताई खैरे, कोषाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी सर्वांनी शिबीरास मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिमराव खोब्रागडे तर संचालन गौतम चौरे सरचिटणीस यांनी केले. तर आभार प्रदर्शन गौतम देवगडे कोषाध्यक्ष यांनी केले. तर प्रारंभी कार्यकर्ता प्रशिक्षणार्थी शिबीरामध्ये अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष सचिव, पर्यटन विभाग, संस्कार विभाग, महिला विभाग, संघटक, या पदाविषयी माहिती कुषानाक पेरकावर यांनी उत्तम तर्हेने शिकविल्याबद्दलची पावती दिली, त्याबद्दल सर्वांनीचे अभिनंदन केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने सर्वच प्रशिक्षणार्थी महिलांना उपासक, उपासिकाना ग्राम शाखे चे प्रमाणपत्र देऊन गोैरविण्यात आले यांचे जिल्हा शाखा व राजुरा शाखच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन ग्राम शाखेचा सत्कार केला. शेवटी सरणत्य घेऊन कार्यक्रम संपन्न झाला. शेवटी सदर कार्यक्रम अविस्मरणीय झाला.
या कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रसंगी पाहुण्यांचा झालेला आदर सत्काराचे स्वरूप पाहुन पाहुण्यांचे मन भारावून गेले. इतरांना बोध घेण्यासारखा प्रसंग होता. राजुरा तालुका शाखेचे अध्यक्ष धर्मुजी नगराळे सर्वच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या महिलांचे व पुरुषांचे चंद्रपूर जिल्हा, राजुरा तालुका व शहर, ग्राम शाखेतर्फे हार्दिक अभिनंदन, धन्यवाद आणि सहर्ष आभार. मानण्यात आले. असेच भारतीय बौद्ध महासभा च्या कार्यास सहकार्य करावे आणि चोवीस शिबिराच्या माध्यमातून बोधिसत्व डॉ बाबासाहेब यांनी दिलेला विज्ञानवादी बौद्ध धम्म घरा घरात पोहचवावा अशी यावेळी मंगलकामना करण्यात आली.

