Monday, May 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

‘तिने माझा मृत्यूची वाट बघितली नाही’ डोक्यात हातोडी मारून पत्नीची हत्या, मग गळफास, नागपुर शहरात खळबळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 3, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
‘तिने माझा मृत्यूची वाट बघितली नाही’ डोक्यात हातोडी मारून पत्नीची हत्या, मग गळफास, नागपुर शहरात खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत तिच्या डोक्यात हातोडी मारून हत्या केला. यानंतर त्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनं संपूर्ण नागपुर शहर हादळल आहे. ही घटना (दिनांक 2 जुलै) रविवारी सकाळच्या सुमारास सदर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दुर्गा माता मंदिर परिसरातून समोर आली आहे. सोनिया राजेश मंडाले वय 37 वर्ष, मॉईल क्वार्टर, दुर्गामाता मंदिर, सदर असे मृत पत्नीचे नाव असून राजेश खेमराज मंडाले वय 51 वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया मॉईल येथे लॅब असिस्टंट पदावर काम करीत होती. त्यात राजेशला कॅन्सर झाला असल्याने तो सध्या घरीच राहत होता. हे कुटुंब मुळचे रामटेक येथील चारगाव येथील रहिवासी होते. राजेश याचे सोनियाचे काम करीत असताना प्रेमसंबंध जुळले. त्यातून राजेशने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि सोनिया बरोबर 14 वर्षांपूर्वी त्याने प्रेमविवाह केला होता. त्यामुळे सोनियाच्या घरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले होते. राजेशला सोनियापासून वैष्णवी नावाची मुलगी असून ती नववीत शिकते. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुले आहेत.

राजेश यांना चार वर्षांपूर्वी कॅन्सर आजाराने ग्रासले होते. त्याचे रूग्णालयात उपचार सुरू होते. साडेतीन महिन्यांपूर्वी मंडाले कुटुंब रामटेक सोडून मॉईलच्या सदर येथील क्वार्टरमध्ये राहायला आले होते. पण राजेश तो घरीच असायचा. पत्नी कामावर जात असताना, तिचे दुसऱ्या कुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. त्यातून त्यांची दररोज भांडणेही व्हायची. शनिवारी रात्रीच्या सुमारास दोघेही खोलीत गेले. त्यानंतर त्याने पत्नीच्या डोक्यात हातोडीने प्रहार करीत तिचा खून केला. नंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली.

रविवारी सकाळी मुलगी वैष्णवी 10 वाजता उठली. तिने वडिलांच्या खोलीचे दार उघडले. तिला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तर वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. तिने याची माहिती मामा अमित अशोक यादव राह. वाहिटोला, रामटेक यांना दिली. त्यांनी घर गाठून याबाबत पोलिसांना कळवले.

‘तिने माझा मृत्यूची वाट बघितली नाही’
घटनास्थळी राजेश याने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलिसाना मिळून आली. त्याबाबत उल्लेख करीत ‘तिने माझा मृत्यूची वाट बघितली नाही’ असे लिहून ठेवले. यावेळी मी मेल्यानंतर घराची रजिस्ट्री आणि कुणाचे किती देणे आहे याचाही उल्लेख केला आहे.

Previous Post

झाडे लावायला मुहूर्त नाही, माणसे शोधायची असतात ! संविधान परिवार इचलकरंजी च्या कार्यकत्याचा वृक्षारोपण उपक्रम.

Next Post

राजुरा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर व सत्कार सोहळा संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुरा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर व सत्कार सोहळा संपन्न.

राजुरा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर व सत्कार सोहळा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In