मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- किड्स ब्राइट फ़्यूचर स्पोर्टिग क्लब हिंगणघाटचे वतीने बीसीसी ग्राउन्ड वर इंडियन सुपर लीगचे बेंगलुरु एफ.सी.टी चे खेळाडू पराग श्रीवास यांचा हिंगनघाट येथे एकदिवसीय दौरा झाला. याप्रसंगी त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शनिवार 1 जुलै रोजी हिंगणघाट शहरातील फुटबॉल खेळाडूंसाठी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीवास् यांनी खेळाडूंना फुटबॉल मधील बारकावे सांगितले. तसेच खेळाडूंचा आहार व होणाऱ्या दुखपती बद्दल सविस्तर माहिती दिली. हिंगणघाट शहरात प्रथमच ISL खेळाडूने मुलांना फ़ुटबॉल खेळाबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली.
यावेळी ISL खेळाडू श्रीवास यांचा सत्कार किड्स ब्राईट फ़्यूचर क्लबच्या वतीने माजी नगरसेवक, पत्रकार संघ हिंगणघाटचे अध्यक्ष प्रा. किरण वैद्य यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. याप्रसंगी राकेश शर्मा, आसिफ मलनस, नज़ीर खान, निसार सैय्यद, शबाना कुरैशी, अब्दुल कदीर बख्श, सनी बासनवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रा. वैद्य यांनी फुटबॉल खेळा बाबत मुलांमध्ये रुची वाढत असून प्रशिक्षक मुस्तफा बक्स हे या करिता निरंतर कठोर परिश्रम घेत आहे. येत्या काळात हिंगणघाट चे मातीतून राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर खेळणारे फुटबॉल पटू दिसतील. असा विश्वास प्रगट केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकासह संचालन किड्स ब्राइट फ़्यूचर क्लब के प्रशिक्षक मुस्तफा बख्श यांनी केले. यावेळी उपस्थितांचे आभार अजय बारसागड़े यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

