आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो.8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एक डारुडा पती आपल्याच पत्नीच्या जीवावर उठल्याची घटना घडली, एका डारुड्या पतीने आपल्याच पत्नीच्या डोक्यावर केला. जीवघेण्या हल्ल्यानंतर दहशतीत असलेल्या पत्नीने ‘मला वाचवा’ असा टाहो करीत थेट हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील आ. समीर कुणावार यांचे निवासस्थानी जाऊन संरक्षणाची मागणी केली. ही घटना तालुक्यातील आर्वी (छोटी) येथील असून या चंदू कांबळे याने पत्नीचे डोके फोडले.
आर्वी (छोटी) येथे राहणाऱ्या दारुड्या पतीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीच्या डोक्याला जबर मार लागला आहे. गावातीलच एका अवैध दारू विक्रेत्या महिलेसोबत अनैतिक संबंध असून तो करूनही कारवाई न झाल्याने दारूड्याचे कुटुंबीय दहशतीत आहेत.
३ जुलै रोजी चंदू कांबळे याने आपल्या पत्नी नीतू कांबळेच्या डोक्यावर वीट मारली. त्यामुळे तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तशाव सुरू झाला. रक्तबंबाळ परिस्थितीत तिने हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय गाठले. येथील वैद्यकीय अधिकार्यांनी तिला गंभीर परिस्थितीत सेवाग्राम येथे पुढील उपचारासाठी पाठविले. सेवाग्राम रुग्णालयात तिला डोक्यावरती 21 टाक्के लागले. परंतु डोक्यावरती 21 टाके लावण्यात आलेल्या या अत्त्यवस्थ महिला रुग्णास रात्रीच येथील डॉक्टरांनी सुट्टी देण्याचा प्रयत्न केला. एकटी महिला मी रात्री कुठे जाणार? अशी विनंती केल्यामुळे तिला तिथे रात्रभर ठेवण्यात आले. परंतु, लगेच सकाळी तिला नातेवाईक येण्याची वाट न पाहताच सेवाग्राम येथील रुग्णालयीन डॉक्टरांनी सुट्टी करून दिली.
सकाळी सेवाग्राम रुग्णालयातून सदर पीडितेने आपल्या लहान मुलासोबत थेट आ. समीर कुणावार यांचे निवासस्थान गाठले. आ. समीर कुणावार यांनी महिलेचेे सांत्वन करीत घटनेची पोलिसांना माहिती दिली. काल पोलिसांनी अटक केलेल्या या दारुड्या पतीवर थातूरमातूर कारवाई करून सकाळी सोडून दिले. दरम्यान, महिलेला पती घरी येऊन इतर कुटुंबीयांना पुन्हा शिवीगाळ करीत धमकावित असल्याची माहिती मिळाली. आ. कुणावार यांनी पोलिस अधीक्षक नुरुल हसन या प्रकरणाची माहिती दिली आहे. आता काय कारवाई करण्यात येणार हे पुढे समजेल.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

