मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधि
अहेरी:- शेतकऱ्यांच्या सर्जा राजाचा आज बैल पोळा सण होता त्यानिमित्त माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतला.
गत दोन वर्षे कोरोनामुळे संणावर संकट उभे झाले होते. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सण उत्साहात साजरे होत आहे. शेतकऱ्यांचा मोठा सण म्हणजे पोळा मानला जातो यावर्षी पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी स्वागावी इंदाराम येथील हनुमान मंदिरात बैल जोडीची विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतला. यावेळी शेतकऱ्यापुढे असलेले संकट टळो अशी सुद्धा इच्छा व्यक्त केली.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे लहान भाऊ इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभवभाऊ कंकडालवार सह संपूर्ण कंकडालवार परिवार उपस्थित होते.