Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

नागपूर: बी.एस्सी नर्सिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या जम्मू काश्‍मीरच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू, वसतिगृहात हलगर्जीपणा?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 6, 2023
in आरोग्य, क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर: बी.एस्सी नर्सिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या जम्मू काश्‍मीरच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू, वसतिगृहात हलगर्जीपणा?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मेडिकलशी संलग्न ‘बी.एस्सी नर्सिंग कॉलेज’ मध्ये शिक्षण घेण्यास जम्मूकाश्मीर येथील विद्यार्थीनी मागील 3 दिवसांपासून आजारी होती. ती ज्या वसतिगृहात राहत होती. तिच्या प्रकृतीची साधी विचारपूस ही कोणी केली नाही. त्यानंतर मैत्रीणींनी तिला मेडिकल रुग्णालयाच्या कॅज्युल्टी येथे नेले. जेआर-1 यांनी बघितले आणि तिला सुटी दिली. वसतिगृहात परतल्यानंतर तिची प्रकृती आणखी गंभीर झाली. अखेर बुधवारी (ता.५) वॉर्ड क्रमांक 52 मध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

मैत्रीणींनी तिला मेडिकल रुग्णालयात नेल्यानंतर प्रशासनाने तिच्या मामा व आईवडिलांना याबाबत माहिती दिली. यावेळी तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळल्या नंतर प्राचार्यापासून तर साऱ्या प्राध्यापकांनी मेडिकलच्या आयसीयूत धाव घेतली.

नागपुर महानगर असल्याने देशातील अनेक राज्यातून मुले मुली शिकायला येतात. ते वसतिगृहात राहून शिक्षण घेत असतात. पण ही विद्यार्थिनीं मागील 3 दिवसापासून आजारी होती तरी वसतिगृहातील प्रशासनाने तिच्याकडे ढुकुनही पाहिले नाही. उपचाराला उशीर झाला आणि तिचा दुर्दैवी अंत झाला.

यात एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या नर्सिंग कॉलजमध्ये वॉर्डन नसल्याची माहिती समोर आली आहे. वॉर्डन नसल्याने आपोआपच ही जबाबदारी प्राचार्यांवर आली आहे. प्रकृतीची विचारपूस कोणीही केली नसल्याची जोरदार चर्चा बीएस्सी नर्सिंगमध्ये सुरू आहे. नागपुरातील मेडिकलशी संलग्न बीएस्सी नर्सिंगमध्ये देशभरातील मुली शिकायला येतात. वसतीगृहात त्या राहतात. नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य, वॉर्डन हेच या मुलींचे पालक असतात. परंतु वॉर्डन नाही. यामुळे मुलींची संपूर्ण जबाबदारी प्राचार्यांची आहे.

बी.एस्सी च्या पहिल्या वर्षाला शिकणारी जम्मू काश्मीर मधील ही मुलगी सोमवारपासून आजारी होती, वर्गात गैरहजर आहे. मात्र तिच्यासंदर्भात कोणीही साधी विचारपूस केली नाही. वसतिगृहात मध्यरात्री दीड वाजता तीची प्रकृती बिघडली. रात्रभर पोटात दुखत होते. मैत्रिणींनी तिला कॅज्युल्टीत आणले. पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या निवासी डॉक्टरने जेआर-1 यांनी बघितले आणि सुटी दिली. ती वसतिगृहात गेल्यानंतर काही वेळात तिची प्रकृती गंभीर झाली. बाह्यरुग्ण विभागात मैत्रिणींनीच आणले. बुधवारी (ता.5) डॉक्टरने तिला तत्काळ वॉर्ड क्रमांक 48 मध्ये दाखल केले. उपचार सुरू केले, परंतु अचानक हाइपरपाइरेक्सियामध्ये गेली. किडनीवरही परिणाम झाला असल्याची माहिती आहे. प्रकृती चिंताजनक असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू केला. नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकांनानी केलेला हलगर्जीपणा या मुलीच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो, अशी चर्चा दबक्या आवाजात येथे आहे.

Previous Post

शेतकऱ्यांनो पिकांवर किटकनाशके वापरतांना काळजी द्या, नाही तर ते ठरू शकते प्राणघातक.

Next Post

राज्यातील 10 लाख वीज मीटरमध्ये बिघाड, जनतेची मोठ्या प्रमाणात सुरू आहे लूट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राज्यातील 10 लाख वीज मीटरमध्ये बिघाड, जनतेची मोठ्या प्रमाणात सुरू आहे लूट.

राज्यातील 10 लाख वीज मीटरमध्ये बिघाड, जनतेची मोठ्या प्रमाणात सुरू आहे लूट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In