अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज नवीन घटना घटत असतांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश असोले फक्त दुरुनच बघण्याचे काम करत होते.एकप्रकारे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यकाळात घडत असलेल्या घटनेचा पाढाच उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या तक्रारीत नमूद केला.
धाबा प्राथमिक आरोग्य केंद्र, सावरा प्राथमिक आरोग्य केंद्र, मुंडगांव प्राथमिक आरोग्य,आगर प्राथमिक आरोग्य केंद्र, दानापुर प्राथमिक आरोग्य केंद्र, मुर्तिजापूर तालुक्यातील सालतवाडा आरोग्य उपकेंद्र, तेल्हारा प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या घटने संदर्भात,तसेच एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण हक्काची सनद लावण्यासाठी, निवेदन तक्रारी व पत्र देऊन ही जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही.तक्रारकर्ते उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांना कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार करून माहिती दिली नाही.कामचुकार, व कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर परिचारिका यांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या कडे केली होती.
परंतु जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी पण जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर काहीच कारवाई केली नाही किंवा तक्रारकर्त्याला काय कारवाई केली याची माहिती दिली नाही म्हणून प्रविण भोटकर संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांना निलंबित करा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार केली व पाठपुरावा केला म्हणून उमेश सुरेशराव इंगळे यांची मागणी मान्य झाली.
कामचुकार डॉक्टर परिचारिका यांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांची बदली करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांच्या लढ्याला यश आले असून त्यांनी महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री यांचे आभार मानले.

