मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली 06 जुलै:- आदिवासी बहूल गडचिरोली जिल्हातील दक्षिण टोकावरचे तालूका अहेरी असून येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी हे आर्थीक दृष्ट्या गरीब असल्यामूळे बहौंताश विद्यार्थीं पेन व नोट बूक विकत घेवू शकत नाही. त्यामूळे एक अभिनव उपक्रमच्या माध्यमातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खमनचेरू व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इतलचेरू येथे अहेरी तालुका कांग्रेस कमेटी तर्फे नोट बूक वाटप करण्यात आले.
अहेरी तालुका कांग्रेस कमेटी तर्फे तालूक्यातील प्रत्येक शाळेत नोट बूक पोहचविण्याचे अभियान राबविण्यात येत आहे तसेच विद्यार्थी आणि पालकांच्या काय अडचन आहेत या जाणून घेतल्या. यावेळी अहेरी तालूका अध्यक्ष डॉ. निसार हकीम, आदिवासी सेल मधूकर सडमेक, यूवक कांग्रेस अध्यक्ष रज्जाक पठाण, अल्पसंख्याक सेल चे हनिफ भाई, ओबीसी सेल राघोबा गौरकार, अशोकभाऊ आईंचवार, ग्राहक संरक्षण सेल नामदेव आत्राम, किसान सेल व सोसल मिडीयाचे सतिश मडावी व इतर कार्यकर्त उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या मूख्यध्यापिका पद्मा रागूलवार मॅडम, पदविधर शिक्षिका सलूजा मॅडम, आत्राम सर गूंडावार सर, कूळमेथे सर व इतलचेरू चे मूख्यध्यापक कूमरे सर, बोम्मावार मॅडम व शाळा व्यवस्थापनचे नरेश मडावी व विलास सिडाम, दादाजी मड़ावी आणि साईनाथ आत्राम, आकाश सड़मेक, अजय मड़ावी बहुसंख्यने पालकवर्ग यांची उपस्थित तसेच यांनी सहकार्य केले.

