पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
गुन्हे शाखा युनिट २पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज!ऑनलाईन पुणे :- चिंचवड पोलीस ठाणे गुन्हा रजि.नंबर 266/2023 आर्म ऍ़क्ट कलम 3 (25) वगैरे प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा युनिट 2 कडून करण्यात येत असुन गुन्हयामध्ये आरोपी क्रमांक 1 राजु उर्फ सलमान पठाण वय 23 रा. भुम जि. उस्मानाबाद यास अटक करुन देशी बनावटीचे पिस्टल व चार राउंड जप्त करण्यात आले आहेत. सदर गुन्हयाचा सखोल तपास करुन अटक आरोपीत यास पिस्टल विक्री करणारा इसम नामे रामकृष्ण सोमनाथ सानप 34 वर्षे रा. विजयनगर भुम जि. उस्मानाबाद हा असल्याचे तांत्रीक व गुन्हयाचे तपासामध्ये निष्पन्न करण्यात आले.निष्पन्न आरोपीत नामे रामकृष्ण सोमनाथ सानप 34 वर्षे रा. विजयनगर भुम जि. उस्मानाबाद यास दिनांक 6/7/2023 रोजी अटक करुन तपासामध्ये आरोपीत याचे राहते घरातुन 01 देशी बनावटीचे पिस्टल व 02 राउंड जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयामध्ये एकूण 02 देशी बनावटीचे पिस्टल व 06 जिवंत राउंड जप्त करण्यात आले आहेत. आरोपीत याची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करुन घेण्यात आली असुन गुन्हयाचा अधिक सखोल तपास सुरु आहे..
सदर कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहीया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस अंमलदार शिवानंद स्वामी, पोलीस नाईक आतिष कुडके, नामदेव कापसे, पोलीस कॉनस्टेबल शिवाजी मुंढे, अजित सानप, उध्दव खेडकर यांनी केली आहे.

