✒️भंडारा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- आज सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे आज समाजात मोठ्या प्रमाणात समाजात तणाव निर्माण होण्याचा घटना वाढत आहे. अशात भंडारा जिल्हातील वरठी पोलिस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील सातोना गावातील एका तरुणाने भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर अत्यंत अश्लील भाषेत आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यामुळे काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर अत्यंत अश्लील भाषेत आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या या तरुणाला रात्री वरठी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्याच्यावर अट्रोसिटी कायद्याअंतर्गत वरठी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून रजत सेलोकर, रा. सातोना असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी रजत सेलोकर, रा. सातोना याने दिनांक 7 जुलै रोजी व्हॉट्सॲपच्या एका ग्रुपवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत ‘संविधान लिहिणारे देशाचे पहिले बलात्कारी’ अशी आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या लोकांत मोठ्या प्रमाणात संताप वाढला होता. याअगोदर पंधरा दिवसांपूर्वी देखील या तरुणाने व्हॉट्सॲप गृपवर भीम सेनेबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यावेळी पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी स्वतः वरठी पोलीस ठाण्यात येऊन या तरुणाला समज दिली होती.
आरोपी रजत सेलोकर हा मुंबई येथून उच्च शिक्षण घेऊन स्वगावी सातोना येथे परत आलेला असल्याची माहिती आहे. त्यांचे भवितव्य खराब होऊ नये याकरिता त्यावेळी त्याच्यावर गुन्हे दाखल न करता समजूत घालून सोडून देण्यात आले होते. मात्र पंधरा दिवसांनंतर त्याने पुन्हा डॉ. बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून धार्मिक भावना दुखावून समाजामध्ये जातीवाचक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या पोस्टवर आक्षेप घेत भीम सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्याकडे आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला अटकेची मागणी केली. काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी ताबडतोब कारवाईचे आदेश दिले.
7 जुलै रोजी आरोपीने हा मजकूर व्हॉट्सॲप ग्रूपवर टाकला होता. त्याचे स्क्रीन शॉट्स काढून पोलीसांत तक्रार देण्यात आली. या प्रकरणी शुभम ऊके रा. सतोना आंबेडकर वार्ड याच्या तक्रारी वरून आरोपी विरोधात वरठी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानच्या अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348