उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातून एक दुःखद घटना समोर आली आहे. तासगाव तालुक्यातील यमगरवाडी येथील मयूर लक्ष्मण डोंबाळे वय 23 वर्ष भारतीय सिमेचे रक्षण करणाऱ्या जवानाने जम्मू- कश्मीरमधील सांबा जिल्ह्यात देश सेवेच्या कर्तव्यावर असताना स्वत:वरच बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने यमगरवाडीसह संपूर्ण तासगाव तालुक्यात हादळला आहे. ही बातमी संपूर्ण तालुक्यात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यमगरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील मयूर लक्ष्मण डोंबाळे वय 23 वर्ष हा दोन वर्षांपूर्वीच भारतीय सैन्य दलात दाखल झाला होता. त्याची नियुक्ती जम्मू- काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात होती. तेथील महेश्वर सैन्य शिबिरात त्याने कर्तव्यावर असताना शुक्रवारी स्वतःवर बंदुकीने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. शुक्रवारी कुटुंबीयांना ही बातमी समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.
जवानाच्या आत्महत्येने परीसरात हळहळ…. मयूरची कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातील होती. त्याचे शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून झाले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो देशसेवेसाठी सैन्य दलात भरती झाला होता. मात्र त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

