पोळा या सणाचा एकिकडे आनंद तर सतत पडणाऱ्या पावसामुळे अतिवृष्टी मूळे शेतकरी हवालदिल.
राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी:- तालुक्यातील डोंगरगाव येथे कोरोना या महामारी संकटाचा काळ संपल्यानंतर या वर्षी बैल पोळा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सलग तीन वर्षाचा काळ लोटल्यांनंतर डोंगरगाव येथे बैल पोळा साजरा करतांना शेतकऱ्यांना मोठा आनंद झाला आहे.
शेतकरी राजा हा आज बैल पोळ्या साठी आपली बैल जोडी तन, मन, धनाने सजवुन त्या बैल जोडीवर झूली घालून आज सार्वजनिक चौकात आणली तिथे मोठ्या आनंदाने गण व आरती म्हणून तोरण तोडण्यात आली शेतकरी राज्याच्या रिती परंपरा नूसार जो कूणी तोरण तोडेल तो 501 रू रोख रक्कम देणे हा निर्णय आणी नियम आहे त्यानूसार सर्वांनी नागरीक व शेतकरी सहकार्य करत पोळा साजरा करण्यात आला.
यावेळी डोंगरगावचे सरपंच, उसरपंच गावातील नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना पोळ्याचा शुभेच्छा दिल्या.