हनिशा दुधे, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. बल्लारपूर तालुक्यात दोन नराधमाने एक अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेनं संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादळला आहे.घरी सोडून देण्याच्या बहाण्याने थेट जंगलात नेऊन एका अल्पवयीन मुलीवर 2 नराधमाने आळीपाळीने अत्याचार केला. त्याचा दोघांनी यावेळी या घटनेचा व्हिडिओ बनविला. शिवाय या प्रकाराबाबत कुणालाही सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना बल्लारपूर तालुक्यातील कळमना जंगल परिसरात 6 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जंगलात नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी तिरुपती पोलादवार वय 22 वर्ष, रा. मुलचेरा, ता. गडचिरोली याला बेड्या ठोकल्या आहे. तर दुसरा आरोपी मोरेश्वर जंपलवार रा. केळझर, ता. राजुरा हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे. बल्लारपूर पोलिसांनी नराधम आरोपी तिरुपती पोलादवार यांना स्थानिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही राजुरा तालुक्यातील केळझर येथे गेली होती. येथून ती आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाली असता ती बामणी फाट्यावर ऑटोची वाट बघत उभी असताना तिथे तिरुपती पोलादवार व मोरेश्वर जंपलवार हे दोघे आपल्या दुचाकीने मोटरसायकल ने आले. आमच्यासोबत चल तुझे पैसे वाचतील, असे आमिष देतत्यांनी तिला दुचाकीवर बसवले. आणि जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना समोर येताच संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

