ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्हातील इगतपुरी तालुक्यातील परदेशीवाडी येथील करवंदे विक्रीसाठी आलेल्या गतिमंद अल्पवयीन मुलीला फूस लावून जळगाव जिल्ह्यात 1 लाखात विक्री केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित महिलेसह दोन जणांना घोटी पोलीसानी बेड्या ठोकल्या आहे.
परदेशीवाडी येथील माहेर असलेली महिला सुरेखा योगेश पाटील हिची करवंदे खरेदी करताना एका अल्पवयीन गतिमंद मुलीची ओळख झाली. त्यानंतर या महिलेने पती योगेश शांताराम पाटील यांनी संगनमत करून या मुलीला घोटी येथून जळगाव जिल्ह्यात नेले. या जिल्ह्यातील कासोदा येथे मनोज राजू शिंपी यास 1 लाख रुपयात विक्री करुन तिचे लग्न त्याच्या बरोबर घरात लग्न लावून दिले. त्यानंतर या मुली बरोबर तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आले.
दुसरीकडे पीडित मुलगी बेपत्ता झाल्यानंतर घोटी पोलीस ठाण्यात पालकांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी गुप्त माहितीद्वारे सदर मुलीचा शोध घेऊन संशयितांना अटक केली.
ही मुलगी गतिमंद असल्याने या मुलीला घराचा पत्ता सांगता येत नसल्याने तिच्यावर महिनाभर अत्याचार झाला. नीट बोलता येत नसल्याने तिला मदतीला कुणालाही बोलावता येत नसल्याचेही समोर आले आहे.