अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- डॉ. तुषार देशमुख हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. ते नेहमी आपल्या कार्यातून समाजसेवा करत असतात. ते यापूर्वी संभाजी ब्रिगेड अमरावती जिल्हाध्यक्ष, विर भगतसिंग विद्यार्थी परिषद राष्ट्रीय कार्याध्यक्ष, तसेच शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात हे ब्रिद घेऊन राष्ट्रीय पातळीवर शिव जन्मोत्सव गेल्या सात वर्षांपासून राबवत आहे.
तसेच डॉ. तुषार देशमुख हे विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करतात. फुटबॉल स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, स्केटिंग स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करुन विद्यार्थी घडविण्याचे कार्य डॉ. तुषार देशमुख करत आहे. त्यामुळे डॉ. तुषार देशमुख यांची संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध स्तरातून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

