✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील हिंगणघाट येथील पोलीस स्टेशन मधून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. वर्धा जिल्हाचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी हिंगणघाट पोलीस स्टेशन मधील कार्यरत गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजे (डीबी) पथकाची तडका फडक बरखास्त केले. त्यामुळे हिंगणघाट शहरात विविध चर्चा उधाण आले आहे.
काही महिन्यापूर्वी वर्धा जिल्हाचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी आपला पदभार स्वीकारला त्यानंतर अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारावर धडक कारवाई सुरू केली. पण हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू, गांजासह वाळू तस्करी सारखे अनेक अवैध व्यवसाय वाढत आहे. त्यावर कधी अंकुश बसेल हे कुणी सांगू शकत नाही असे चित्र दिसून येत आहे.
हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये सध्या दोन गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजे डीबी स्कॉट कार्यरत आहे यापैकी गेल्या तीन वर्षापासून येथील गुन्हे अन्वेषण शाखा बद्दल सारख्या तक्रारी येत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्या तक्रारींची दखल घेत सदर डीबी पथक बरखास्त करण्याचे आदेश काढल्याने येथील पोलीस डी.बी पथकात मोठी खळबळ माजली आहे.
विशेष म्हणजे येथील पोलीस स्टेशन काही ना काही कारणामुळे नेहमीच चर्चेच्या राहत असल्या मुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या संबंधात त्वरित तक्रारीची दखल घेत गुन्हे अन्वेषण शाखाचे जमादार व दोन शिपाई यांची शाखेवरून बरखास्त करून त्यांना स्टेशन डायरीवर ड्युटी करण्याचे आदेश दिले आहे. सदर डीबी पथक विवादग्रस्त होते. त्यात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक गंभीर आरोप सुद्धा तक्रारकर्त्यांनी केले होते. त्याची समान विभागणी केल्या जात होती, असे सुद्धा तक्रारीत नमूद केले होते. या संबंधात सखोल चौकशी केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी या डीबी पथकाला बरखास्त केले.

