एडवोकेट अंकिता रा जयसवाल (सायबर कन्सल्टंट) B A,LL.B, LLM (Cyber law) PGDHR, दिवाणी व फौजदारी न्यायालय वरुड, जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती यांच्या कडून संपूर्ण लेख मध्ये.
आजच्या लेखात आपण बघणार वीज बिल थकलं असेल तर सावध व्हा; सायबर ठगांकडून होऊ शकते फसवणूक, चुकूनही ‘हे’ करू नका, त्याआधी तुम्ही माझ्या फेसबुक पेज लीगल अवेयरनेस टॉक बाय एडवोकेट अंकिता आर जयसवाल ला भेट द्या, आनी माझ्या nyaykagyan.blogspot.com ला विजिट दया, भरपूर दिवसाने माझ्या चाहत्या वाचकान साठी सुंदर असा जागतिक लेख सायबर क्राईम स्कॅम ऑन electricity bill यावर लिहत आहे, आज जितके वेगवान डिजिटल जगाकडे वाटचाल करीत आहोत, सायबर गुन्ह्यांची संख्याही जलद वाढत आहे. तंत्रज्ञान ज्या वेगात प्रगती करत आहे त्याच वेगाने इंटरनेटवर माणसाची अवलंबित्वही वाढली आहे. एकाच ठिकाणी बसून इंटरनेटद्वारे मानवांचा प्रवेश जगातील प्रत्येक कोप रयात सोपा झाला आहे. आजच्या काळात, एखादी व्यक्ती ज्या गोष्टीबद्दल विचार करू शकते, ती इंटरनेटद्वारे प्रवेश केली जाऊ शकते, जसे सोशल नेटवर्किंग, ऑनलाइन शॉपिंग, डेटा संग्रहित करणे, गेमिंग, ऑनलाइन अभ्यास, ऑनलाइन नोकरी इ. आज इंटरनेट जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात वापरली जाते. इंटरनेटच्या विकासासह आणि त्याच्याशी संबंधित फायद्यांबरोबरच सायबर गुन्ह्यांची संकल्पनाही विकसित झाली आहे. सध्या भारतातील बरीच लोक सोशल नेटवर्किंग साइट वापरतात. भारतात सोशल नेटवर्किंग साइट्सच्या वापराविषयी माहितीचा अभाव आहे. यासह, बहुतेक सोशल नेटवर्किंग साइटचे सर्व्हर परदेशात आहेत, ज्यामुळे भारतात सायबर गुन्हेगारीच्या मुळावर जाणे कठीण होते. सायबर क्राइममध्ये खंडणी, ओळख चोरी, क्रेडिट कार्डची फसवणूक, संगणकावरील वैयक्तिक डेटा हॅक करणे, फिशिंग, बेकायदा डाउनलोड करणे, सायबर साठवण, व्हायरस प्रसार यासह विविध प्रकारच्या उपक्रमांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ‘एसएमएस’ (SMS) पाठवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे. त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगणे आणि या प्रकारे वीजग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून आलेल्या बनावट एसएमएसला कोणताही प्रतिसाद देऊ नये,
ग्राहकांची आर्थिक फसवणूक कशी होते?
मागील काही दिवसांपासून विविध ग्राहकांना बनावट एसएमएस पाठवून लुबाडण्याचे प्रकार घडत आहे. नुकतेच काही शहरात बनावट SMS पाठवून ऑनलाईनद्वारे लुबाडल्याचा प्रकार घडत आहे. यासोबतच महावितरणने देखील बनावट SMS प्रकरणी सायबर सेलमध्ये याआधी तक्रारी दाखल केल्या आहेत. मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, त्यामुळे सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट SMS नागरिकांना पाठविण्यात येत आहेत.
लाईट बिल भरणे /विज बिल भरणे संभंधित फेक मेसेजेस
तुम्हाला अनोळखी नंबर वरून एक मेसेज येईल किंवा फोन येईल की तुमचे लाईट बिल भरले गेलेले नाही. जरी तुम्ही लाईट बिल भरले गेले असले तरी तुम्हाला वेगवेगळे कारण सांगतील जसे की सिस्टीम मध्ये अपडेट झालेला नाही किंवा सर्वर डाऊन असल्यामुळे तुमचे लाईट बिल भरले गेले नाही. तुम्ही जर लाईट बिल भरले नाही तर तुमचे वीज कनेक्शन बंद करण्यात येईल अशा प्रकारचे मेसेज किंवा फोन करून तुम्हाला घाबरवलं जाईल. किंवा लाईट बिल भरा अन्यथा कनेक्शन बंद होईल /वीज बंद केली जाईल, अशा प्रकारचे मेसेज किंवा फोनद्वारे विश्वास संपादन करतात त्यामुळे लोकांचा विश्वास बसतो व लोकांना विज बिल भरण्यासाठी खालील प्रक्रिया करण्यासाठी सांगतात.
- महावितरण किंवा संबंधित वीज वितरण कंपनीचा लोगो असलेले ॲप डाऊनलोड करायला सांगतात.
- त्याचबरोबर Any desk ,Quick support, Teamviwer सारखे थर्ड पार्टी रिमोट एक्सेस ॲप डाऊनलोड करायला सांगतात.
- सदर ॲप्स माध्यमातून अनोळखी लिंक पाठवून विज बिल भरण्यास सांगतात.
- सुरुवातीला लाईट बिल सारखे भासवणारे कमी पैशाचे व्यवहार करण्यास सांगतात.
- नंतर थर्ड पार्टी ॲप डाउनलोड केल्यामुळे बँक खात्यातील संपूर्ण रक्कम गायब होते.
- सर्वात शेवटी थर्ड पार्टी ॲप डिलीट करण्यास सांगतात त्यामुळे पैसे डीडक्ट झालेला मेसेज ही आपल्याजवळ पुरावा म्हणून राहत नाही.
अशाप्रकारे लाईट बिल भरण्याचा नावाखाली लोकांना विश्वासात घेऊन फसवणूक होण्याचे प्रकार सध्या खूप प्रमाणात वाढत आहेत .यावर खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी खालील प्रकारे काळजी घ्यावी*. - कोणताही अनोळखी फोन कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद देऊ नका
( मग तो बँकेद्वारा असो इतर सरकारी कंपन्या द्वारे असो किंवा महावितरण किंवा लाईट बिल मंडळातर्फे असो) - कोणतेही थर्ड पार्टी ॲप जसे की Any Desk, Quick Support, TeamViewer सारखे ॲप डाऊनलोड करू नका व अनोळखी लिंक वर क्लिक करू नका.
- कोणालाही ओटीपी शेअर करू नका व स्वतःच्या बँकेची व गोपनीय माहिती शेअर करू नका.
- कोणतेही बिल भरणा करताना अधिकृत साईड वरूनच जाऊन किंवा प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊनच व्यवहार करावा.
वरील प्रकार सारख्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा मेसेज किंवा फोन ला प्रतिसाद देऊ नका.अधिक माहितीसाठी जवळच्या पोलीस स्टेशन ला संपर्क साधा.
महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे SMS पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’ (MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. तसेच या अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याबाबत कळविले जात नाही. ‘वीजबिलाची रक्कम भरलेली नसल्याने वीजपुरवठा आज रात्री खंडित करण्यात येत आहे’ असा संदेश वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठविण्यात येत असल्याचे पुन्हा प्रकार घडत आहेत. या मेसेजनंतर वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठविण्यात येत आहे. तसेच ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. ग्राहकांनी त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून बॅक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी या बनावट मेसेज व लिंककडे संपूर्णपणे दुर्लक्ष करावे.
काय करावे जर आपणासोबत वरील प्रमाणे प्रकार घडल्यास?
काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरु असलेल्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा. तसेच अशाप्रकारे संदेश आल्यास ग्राहकांनी cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रारीची नोंद करावी, असेही आवाहन महावितरणने केले आहे तुमच्या सोबत असे काही घडले असेल तर एफ आय आर द्या, सायबर सेल ला रिपोर्ट द्या,
फ्रॉड्स चे स्वरूप प्रत्येक वेळी नवीन असेल. तेंव्हा काळजी घ्या सावध राहा… आणि हा लेख शेअर करायला विसरू नका तुमच्यामुळे बाकी सर्व जागरूक होतील म्हणून भरपूर शेअर करा. वरील प्रमाणे संपूर्ण लेख मध्ये ऍडव्होकेट अंकिता रा जयस्वाल यांनी वीज वितरणाच्या ग्राहकांना तसेच संपूर्ण जनतेला सतर्कतेचा व सावधान राहण्याचा इशारा केला आहे!
साइबर कंसलटेंसी साठी किंवा काही सायबर फ्रौड झाल्यास मला कॉन्टॅक्ट करा तसेच मला माझ्या फेसबुक पेज का मैसेज करूंन सांगू सकता, लेख आवडला असेल तर कॉमेंट्स मधे सांगा आणि सर्वांना शेअर करा.