पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे सौ यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हदीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाची बातमी प्राप्त करून त्यांचेविरुद्ध कडक कार्यवाही करणेबाबत आदेश दिलेले होते. त्यानुसार आमचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील दरोडा विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम अधिकारी व अंमलदार हे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची गोपनीय बातमी प्राप्त करीत होते. तळेगाव दाभाडे येथे झालेल्या किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचलेल्या खुनाच्या कटाचा तपास सुरु असताना दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीवरून सोमाटणे फाटा जवळ दि.०३/०७/२०२३ रोजी आरोपी नामे सुधीर अनिल परदेशी वय २५ वर्षे, रा. फ्लॅट नं २०३ साई धाम सोसायटी, केशवनगर, लगाव ता मापळ जि पुणे यारा ०२ गावठी पिस्टल व १६ जिवंत काडतुसे (राउण्ड) राह ताब्यात घेण्यात आले. त्याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर होवुन पुढील तपास दरोडा विरोधी पथकामार्फत सुरु होता.
सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान आरोपी सुधिर परदेशी यांने त्याचा साथिदार आरोपी नामे शरद साळवी याचे मार्फतीने मध्यप्रदेश राज्यातून ०३ गावठी पिस्टल व ४० जिवंत काडतुसे आणल्याचे सांगितले व त्यापैकी ०१ पिस्टल व २४ राउण्ड है Chartered accountant (CA) विवेक लाहोटी यानी स्वतःकडे ठेवल्याचे सांगितले. सदरबाबत CA विवेक लाहोटी याचा शोध घेतला असता तो चिचगड येथे त्यांचे राहते घरी मिळुन आला. त्याच्या कडे ०१ पिस्टल व २४ राऊंड मिळुन आले. त्यास सदर गुन्हयामध्ये अटक केली व पोलीस कोठडी दरम्यान CA विवेक नंदकिशोर लाहोटी, वय ४२ वर्षे व्यवसाय सनदी लेखपाल, रा ए १/२ एच.डी.एफ.सी. कॉलणी, शाहुनगर, चिंचवड, पुणे. याने आरोपी सुधिर परदेशी व शरद साळवी या सराईत गुन्हेगारांना ५० लाख रुपयांची राजु माळी यास मारण्याची सुपारी दिली होती त्याबाबत पुरावे मिळाले आहे.
अटक आरोपी सुधिर परदेशी हा पोलीस अभिलेखावरील गंभिर गुन्हे करणारा गुन्हेगार असल्याने त्याचा एका प्रतिष्ठीत सनदी लेखपालाशी कसाकाय संबंध आला तसेच त्याने त्याचेकडे अग्नीशस्त्रे कशीकाय ठेवली असावी ही बाब संशयास्पद वाटत होती. त्यामुळे सदर दोन्ही आरोपींना अटक करून त्यांचेकडे पोलीस कोठडी दरम्यान करान उपास केला असता सनदी लेखपाल विवेक लाहोटी याचा जमिन खरेदी विक्रीच्या व्यवसायातील भागीदार असलेला इसम नामे राजु माळी, रा सोमाटणे फाटा, मावळ, पुणे यांचेसोबत झालेल्या व्यवहारातील गैरसमजुतीन सदर सनदी लेखपाल याने त्याची जवळची मैत्रिण एक महिला हिये मार्फतीने आरोपी नामे सुचिर परदेशी यास ५० लाख रुपयांच्या मोबदल्यात राजु माळी याचा खुन करण्याची सुपारी दिली असल्याचे व त्याच कामासाठी सदरची अग्नीशस्त्रे आणल्याची निष्पन्न झाले. त्यामुळे सदर गुन्हयामध्ये सदर महिलेस देखील अटक करण्यात आली आहे. यातील इसम नामे राजु माळी हे दर शनिवार व रविवार सातारा जिल्यातील त्याच्या बांधकाम साईट येथे भेट देवुन तेथेच मुक्काम करतात ही बाब हेरुन सदर आरोपींनी त्याच ठिकाणी सदर खुनाचा कट अमलात आणण्याचे ठरविले होते व त्याठिकाणी रेकी करण्यासाठी भेटी दिल्या होत्या. त्यांनी कट आमलात आणने करीता सदरचे ठिकाण निवडण्यास कारण की, त्या ठिकाणी काही प्रकार घडल्यास पोलीसांना लवकर सुगावा लागनार नाही.
सदर गुन्हयाचा पुढील तपास दरोडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख हे करीत आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. श्री. विनयकुमार चौबे सो पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा श्री चरांत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिं. वि. मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पिं चि. मा श्री सतिश माने सो. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पंचंमा श्री बाळासाहेब कोपनर सो. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पिंथिं. यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक, दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस अंमलदार आशिष बनकर, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, गणेश हिंगे, गणेश सावंत, विनोद वीर, समिर रासकर सुमित देवकर, महेश खांडे, सागर शेडगे, उमेश पुलगम, प्रविण माने, राजेश कौशल्य राहुल खारगे, नितीन लोखंडे चिंतामण सुपे व अमर कदम सर्व नेमणुक दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी केली आहे.

