मंगेश जगताप, मुंबई विक्रोळी प्रतिनिधी
मो नंबर 8657345916
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- दि. ९ जुलै रोजी ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष अशोक राय यांच्या नेतृत्वाखाली व वॉर्ड क्र.१२० चे अध्यक्ष संदीप तुर्भे यांच्या प्रयत्नाने शेकडो माथाडी कामगारांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्यानकारी योजना समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोचविण्यासाठी पक्षाच्या बागलाण तालुक्यातील सर्व जुन्या व नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सांगड घालून पक्षासाठी काम करावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष अशोक राय यांनी केले.
मुंबई येथील शेकडो माथाडी यांनी भाजपच्या कार्यालयात त्यांच्या पक्षप्रवेश केला. यावेळी मुंबई भाजपा स्थानिक नेते उपस्थित होते. या सर्व लोकांनी केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडवणीस भाजपचे खासदार मनोज कोटक यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन भाजपा प्रवेश केला. फडणवीस यांच्या सहकार्याने पक्षाच्या माध्यमातून शहराचा प्रलंबित विकास आणि माथाडी कामगारांचे प्रश्न सुटण्यासाठी आम्ही कार्य करणार असे यावेळी सांगितले.
कोणतीही अपेक्षा न ठेवता येत्या मनपा निवडणुकीत भाजपचे नगरसेवक निवडून महानगर पालिकेवर भाजपचा झेंडा फडकावून पक्षाचा विश्वास सार्थ ठरवेन असा विश्वासही व्यक्त केला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

