डॅनियल अँथनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी, ता. ११:- मोका अंतर्गत कारवाई झालेले मात्र, गेली आठ महिन्यापासून पोलीसांना पाहिजे असलेले आरोपी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केला आहे. या आरोपींवर पोलीस स्टेशन तसेच भोसरी एम आयडीसी पोलीस स्टेशन मध्ये विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. विशाल उर्फ दादया मरीया कांबळे वय ३८ वर्ष रा. मोहननगर, चिंचवड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदार हे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेत असताना पथकातील पोलीस नाईक आशिष बोटके आणि हवालदार कानगुडे याना माहिती मिळाली की पिंपरी स्टेशन येथील खुनाच्या गुन्ह्यातील आणि मोका कायदा अतंर्गत कारवाई झालेला व गेली आठ महिन्यापासून फरार आरोपी विशाल उर्फ दादया मराठा कांबळे हा हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत जांबे येथे येणार आहे.
मिळालेल्या माहितीची खाली झाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस कर्मचारी यांनी हिंजवडी परिसरातून आरोपी विशाल कांबळे याला ताब्यात घेतले आरोपी विशाल कांबळे यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.

