अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- रस्त्याच्या कडेला असलेल्या व अपघातास आमंत्रण देणाऱ्या झाडांची कटाई करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
अकोला शहरातील नविन बांधण्यात आलेल्या निमवाडी ते हुतात्मा चौका पर्यंत च्या उड्डाण पुलाच्या व मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतींला लागुन असलेल्या झाडाच्या फांद्या खुप मोठ्या प्रमाणात वाढल्या असुन अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाळ्यात पाऊसामुळे हे फांद्या खुप खाली वाकत असुन वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. तर काही झाडाच्या फांद्या हे निमवाडी ते हुतात्मा चौका पर्यंत असलेल्या उड्डाणपुलाच्या मधोमध जात असुन वाहन चालवताना उड्डाणपुलावर अपघात होऊ शकतो. म्हणुन या झाडांच्या फांद्याची कटाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

