सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- चंद्रपुर जिल्हातील घुग्गुस शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्व शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घुग्गुसमध्ये एक घर चक्क 70 फूट जमिनीत उभं गाडलं गेलं. कोळसा खाणींच्या जवळ असलेल्या आमराई भागात ही घटना घडली आहे. काल अचानक घर हालायला लागल. त्यामुळे घरातील लोक तातडीने घरा बाहेर धावत निघून आले आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणात हे घर जमिनीत गाडल गेलं. 70 फुटांचा खड्डाही पडला. कोळसा खाणीमुळे हा प्रकार झाल्याची या भागात चर्चा आहे.
चंद्रपूर जिल्हात मोठ्या प्रमाणत कोळसा खाणी आहे. त्यामुळे हा जिल्हा धोकादायक आहे अस तरी याघटनेवरून समोर आले आहे. घुग्गुस शहरात गजानन मडावी यांचं हे घर होतं. कोळसा खाणींच्या जवळ असलेल्या आमराई वार्डात ही घटना घडली. या शहराशेजारी सर्वत्र असलेल्या भूमिगत कोळसा खाणीमुळे हा प्रकार झाल्याची चर्चा आहे. गजानन मडावी यांचे राहते घर संध्याकाळच्या दरम्यान एकाएक हलू लागल्याने भीतीमुळे घरातील सदस्य घरा बाहेर निघाले. त्यानंतर काही क्षणातच अख्खे घर 70 फूट जमिनीत गाडल्या गेले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीखाली आहे.
सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या खाणीमुळे या परिसरात अनेकदा घरांना तडे गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा पद्धतीने एकच घर 70 फूट गडप होण्याची ही खळबळजनक घटना पहिल्यांदा समोर आली आहे. घटनास्थळी महसूल- खाण प्रशासन आणि पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.
परिसरातील नागरिकांनी याआधीही कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या खाणीमुळे तिथल्या घरांचं नुकसान होत असल्याबाबत तक्रारी केल्या आहेत. वारंवार सांगून देखील याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. आता घुग्गुसमधील या घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल केला जात आहे. अख्खं घरच गाडलं गेल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सुदैवाने यावेळी घरातील लोक घराबाहेर पडल्यानं कुठली जीवितहानी झाली नाही.