Tuesday, March 24, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home कोकण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष लाखोची खंडणी घेताना रंगेहाथ सापडला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 13, 2023
in कोकण, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष लाखोची खंडणी घेताना रंगेहाथ सापडला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️रायगड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन रायगड:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर आणि त्यांच्या साथीदारांना पेण पोलिसांनी पाच लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. त्यांनी मुद्रांक विक्रेत्याकडून 10 लाखांची खंडणी मागितली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूरसह अन्य सहकाऱ्यांना पेणच्या सेतू कार्यालय चालक, मुद्रांक विक्रेत्याकडून रोख दीड लाख रुपये घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. मुद्रांक विक्रेत्याकडून कार्यालय सुरु ठेवण्यासाठी 10 लाख रुपयांची खंडणी त्यांनी मागितली होती.

10 लाख रुपयांची खंडणी : काही दिवसांपासून तालुक्यातील विद्यार्थी दाखले घेण्यासाठी पेण येथील सेतू कार्यालयात गर्दी करत होते. हीच संधी साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी मनसेच्या अन्य सहकाऱ्यांसह सेतू कार्यालयासमोर स्टंटबाजी केली. यावेळी फिर्यादी तथा मुद्रांक विक्रेता, माजी नगरसेवक हबीब खोत यांच्यावर दबाव आणण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पेण तहसील कार्यालय परिसरात गोंधळ घातला होता. यावेळी दबाव निर्माण करण्यासाठी पेण तहसील कार्यालय परिसरात धरणे आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी फिर्यादी तथा मुद्रांक विक्रेता खोत यांच्याकडे त्यांनी 10 लाख रुपयांची खंडणी त्यांनी मागितली.

पोलिसांनी रंगेहात पकडले: त्यानंतर आरोपी संदीप ठाकूर याने हबीब खोत यांना 1 जुलै रोजी राजू पोटे मार्गावरील नारायण निवास येथील कार्यालयात भेटण्यासाठी बोलविले. त्यावेळी त्यांनी खंडणी न दिल्यास तुझा परवाना रद्द करु, अशी धमकी दिली. शेवटी ताडजोडीअंती 2 लाख रुपये देण्याचा ठरले होते. खोत यांची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 11 जुलै रोजी पेणचे उप विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना पोलिसांनी तक्रार देण्याचे सांगितले. खोत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून सायंकाळी 7 च्या सुमारास संदीप ठाकूरसह त्यांच्या सहकाऱ्यांना रंगेहात पकडले आहे.

पेण पोलीस ठाण्यात गुन्हा : या प्रकरणी कलम 386, 506, 34 अंतर्गत पेण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

तृतीय पंथी भाजपा नेते नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक, राणे यांच्या तोंडाला काळे फसणार?

Next Post

मुलगी गोरी आणि जावई काळा, रंग आवडला नाही म्हणून सासुने जावयावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुलगी गोरी आणि जावई काळा, रंग आवडला नाही म्हणून सासुने जावयावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले.

मुलगी गोरी आणि जावई काळा, रंग आवडला नाही म्हणून सासुने जावयावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In