प्रवीण जगताप, प्रतिनिधी
भंडाराः- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून एका 34 वर्षीय विवाहितेने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपल्याची खळबळजनक घटना भंडारा शहरात घडली आहे. या प्रकरणी नवऱ्यासह सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पल्लवी प्रवीण लांजेवार वय 34 वर्ष असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी पल्लवीने गळफास लावून आपल जीवन संपवल. पल्लवीचा तिच्या सासरकडील लोक शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याने तिने आत्महत्या केल्याच्या आरोप पल्लवीचा आई वडिलांनी केला आहे. या प्रकरणी पल्लवीचा नातलगांनी भंडारा शहर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे सासरकडील मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भंडारा पोलिस करीत आहे.