पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १. गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- जयभवानी नगर पौड रोड, कोथरुड, पुणे येथे राहणा-या महिला नामे सौ. मनिषा किरण जाधव या दिनांक ११/०७/२०२३ रोजी मुलाला शाळेत सोडायला घराचे कुलुप लावुन चावी कुलुपालाच विसरुन गेल्या होत्या. संध्याकाळी त्या घरी परतल्यावर घरातील कपाटाकडे जावुन पाहिले असता फिर्यादी यांना त्यांनी कपाटात ठेवलेल्या सोन्याचे दागिन्यांमधील अंगठीच्या डबीचे झाकण उघडलेल्या स्थितीत आढळून आले. त्यामुळे त्यांना शंका आल्याने त्यांनी कपाटातील तिजोरी चेक केली असता तिजोरीतील सोन्याचे दागिने व पर्समधील काही दागिने व ४० हजार रोख रक्कम असा एकुण रु २ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याने त्याबाबत त्यांनी कोथरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं १६२/२०२३. भादंवि कलम ४५४,३८० अन्वये तक्रार दिलेवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याथा इकडील अधिकारी व अंमलदार यांचेकरवी समांतर तपास चालु असताना स्टाफने सी. सी.टि.व्ही. फुटेज वरुन एका महिलेच्या संशयास्पद हालचाली पाहून त्या महिलेचा तपास केला असता स्टाफमधील पोलीस नाईक २८८ धनंजय ताजणे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वर नमुद गुन्ह्यातील महिला ही बेनकर वस्ती, धायरी, पुणे या परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर नमुद महिलेचा वरील परिसरात शोध घेतला असता ती मिळुन आल्याने स्टाफमधील महिला पोलीस अंमलदार यांचेकरवी तिस ताब्यात घेवुन तिचेकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर व पोलीस उप निरीक्षक शाहिद शेख यांनी अधिक चौकशी करता तिने फिर्यादी यांचे घराचे कुलुपाला चावी असल्याचे पाहून कुलुपाला असलेलया चावीनेच कुलुप उघडुन दरवाजावाटे आत प्रवेश करुन सदरची घरफोडी चोरी केल्याचे कबुल केल्याने नगद महिलेकडुन चोरीस गेलेले एकुण ४९.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ४० हजार पैकी ८ हजार रुपये रोख रक्कम असा एकुण २,५५,२९०/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर महिलेस पुढील कारवाई करीता कोथरुड पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास कोथरुड पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कारवाई पुणे शहरचे मा. पोलीस आयुक्त सो, श्री रितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त सो, श्री. संदीप कर्णिक, मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) मा. श्री. अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त मा. श्री. सुनिल तांबे, (गुन्हे १) यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उप निरीक्षक शाहिद शेख, पोलीस नाईक धनंजय ताजणे, पोलीस हवालदार प्रदीप राठोड, म.पोलीस हवालदार हेमा देबे, पोलीस नाईक गणेश ढगे, मॅगी जाधव, आजिनाथ येडे, पोलीस अमलदार शिवाजी सातपुते दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

