पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- इझीपे प्रा. लि. येरवडा, पुणे ही कंपनी भारतभर अनलाईन पेमेंटची सुविधा जनतेस पुरविण्याचे काम करते. सदर कामाकरीता नमुद कंपनीचे भारतभर नोंदणीकृत एजेंटची नेमणूक केलेली आहे व त्यांच्या माध्यमातून कंपनीचे कामकाज चालते दिनांक ११/०८/२०२२ रोजीपासून नमुद कंपनीतील नोंदणीकृत असलेल्या एटापैकी ६५ एजेंट यांनी संगनमत करून कंपनीच्या वेबपोर्टल अॅप व्दारे कंपनीच्या अधिकृत यंत्रणेत कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अधिकृत केलेल्या मोबाईल व्यतिरिक्त दोन ते चार व त्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या मोबाईल संचांचा वापर करून अनधिकृतपणे सदर मोबाईल व्दारे लॉग इन आयडीने लॉग इन करुन कंपनीच्या तांत्रिक सुविधांचा गैरवापर केला व कंपनीचे व्हीपीए खात्यामधून अन्य ४४ बँक खात्यावर एजंटचे कमिशन व्यतिरिक्त ३,५२,७०,२१०.८२/- रुपयांची कंपनीची फसवणूक केली म्हणून दिले तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. २० / २०२३ भा.दं.वि. कलम ४५९ ४२० ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ४३/६६, ६६ डी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सायबर पोलीस स्टेशन कडून सदर गुन्हयातील प्राप्त माहितीये तांत्रीक विश्लेषण करता सदर गुन्हयातील संशयित आरोपी नामे अंकित कुमार अशोक पांडे याचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणावरून तो दिल्ली येथील जसल्याचे दिसून येत होते. त्यानुसार सायबर पोलीस स्टेशन कडील पोलीस पथक दिल्ली येथे गेले असता त्याचे लोकेशन पश्चिम बंगाल येथे असल्याचे मिळून आले. यावरून सदर आरोपी हा एके ठिकाणी जास्त काळ वास्तव्यास नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दिल्ली येथून आमचे पोलीस पथक आरोपीताचा पाठलाग करत पश्चिम बंगाल येथे पोहोचले तेथील गाव मामरा, दुर्गापूर, वर्धमान जिल्हा येथे जावून आरोपी नामे अंकित कुमार अशोक पांडे, वय २० वर्षे, रा. अरविंद मिश्रा यांचे घर सी/१८, निवेदितो पार्क, ममरा, दुर्गापूर, वर्धमान, पश्चिम बंगाल येथून ताब्यात घेतले. सदर आरोपीताकडून एक मोबाईल फोन व दोन लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपीताचा मुळ पत्ता महेश दिन गाय, काजीया, गोडापूर, नवादा बिहार असे असल्याचे त्याचेकडे केले तपासादरम्यान मिळून आले आहे. नमुद आरोपी हा त्याची सदर गुन्हयातील अटक टाळण्याकरीता वेगवेगळ्या राज्यांमध्ये लपून छपून वास्तव्य करीत होता. त्यास सायबर पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोउनि तुषार भोराले अमलदार राजकुमार जाबा, बाबासाहेब कराळे, नवनाथ जाधव, बापू लोणकर, निलेश लांडगे यांनी अविश्रांत नमुद आरोपीचा मागोवा घेत त्यास पश्चिम बंगाल येथून अटक केली व इझी पे कंपनीची कोटयावधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा उघड केला आहे. सदर आरोपीतास रिमांड रिपोर्टसह मा. न्यायालयासमा हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीतास दिनांक १९/०७/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे.
सदरची कारवाई मा. श्री रितेश कुमार, पोलीस आयुक्त, मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, मा. श्री रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्रीनिवास घाडगे, पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, मा. अप्पासाहेब शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले, पोलीस अंमलदार राजकुमार जाबा, बाबासाहेब कराळे, नवनाथ जाधव, निलेश लांडगे, बापू लोणकर, शाहरूख शेख, संदेश कर्णे, नितिन चांदणे, संतोष जाधव या पोलीस पथकाने यशस्वी रित्या पार पाडली आहे.

