पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- लोणीकंद पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर कुमार गायकवाड, वय ३३ वर्षे, रा. अमर चौक केसनंद ता. हवेली जि. पुणे यांस पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४, पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पुणे जिल्ह्यातुन ०१ वर्षाकरीता तडीपार केले आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील केसनंद तसेच आसपासच्या भागात दहशत निर्माण करून लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणाऱ्या दहशत निर्माण करून लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातून कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवु नये तसेच सदर सराईत गुन्हेगारातर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सदर इसमावर मा. सह.पोलीस आयुक्त श्री. संजय पाटील, लोणीकंद पोलीस स्टेशन तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी. पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी सदर सराईत इसम याचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर -इसम यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उपायुक्त श्री. शशिकांत बोराटे यांना प्रस्ताव पाठविला असता, श्री शशिकांत बोराटे यांनी सदर सराईतास पुणे जिल्ह्याचे हदीतुन एक वर्षाकरीता तडीपार केले आहे.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त सो. श्री. रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उपायुक्त सो..श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त सो. श्री. संजय पाटील, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी केली आहे.
सदरचे तडीपार इसम हे पुणे जिल्ह्याचे परिसरात आढळुन आल्यास त्यांची माहीती लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर संपर्क क्र. ९५२७०६९१०० यावर कळविण्याचे आवाहन लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित काईगडे यांनी केले आहे.

