प्रांजलि पंकज पाध्ये वाशिम जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित साधून महिलांचा भव्य मेळावा आयोजित.
सीमा सुरूशे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- दिनांक १३ गुरुवार रोजी मालेगाव शहरातील माँ साहेब भवन येथे भाजपा प्रदेश सदस्य युवा नेते राजु पाटिल राजे यांच्या अध्यक्षतेखाली, प्रांजलि पंकज पाध्ये वाशिम जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित साधून महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता
काही दिवसांपूर्वी मुंबई येथे महिला प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांनी महिलानसाठी सहकार उद्योग क्षेत्रा साठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते तेव्हा मालेगाव तालुक्यातुन शेकडो महिलाना राजु पाटिल राजे यांनी स्व खर्चाने या शिबिरासाठी पाठवीले होते. त्या अनुषंगाने महिला वाशिम जिल्हाउपाध्यक्ष सौ.प्रांजली पाध्ये यांच्या वाढदिवसाचा निमित्याने मालेगाव तालुक्यातील प्रशिक्षणासाठी गेलेल्या व काही गरजु महिलांना साडी चोळी, प्रांजलिताई पाध्ये यांच्या वतीने वाटप करण्यात आले. यावेळी सर्व महिलांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

महिला वाशिम जिल्हाउपाध्यक्ष सौ.प्रांजली पाध्ये या पक्ष वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत. त्यांच्या कार्याला प्रभावित होऊन अनेक महिला भाजपात आल्या आहे. 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करून त्यांनी सर्व समाजात आपला ठसा उमटविला आहे. सर्वांना सोबत घेऊन समोर जात असल्यामुळे अनेक महिलांनी सौ.प्रांजली पाध्ये त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते राजु पाटील राजे होते यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मालेगाव भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश मुढे, भाजपा जेष्ठ नेते डॉ. विवेक माने, शहरअध्यक्ष संतोष तिखे, रिसोड भाजपा तालुका अध्यक्ष शकंराव बोरकर, युवा तालुका अध्यक्ष गणेश पाटील कुटे, किसनराव माळेकर, मोहनभाऊ बळी महाराष्ट्र प्रदेश सदस्य ओबीसी मोर्चा, मुन्ना भाऊ मुदडा तालुका उपाध्यक्ष, गजानन भाई नवघरे ता. सरचिटणीस, आयुप सर, पप्पु पाटील कुटे, तेजस आरु, पवन इंगळे सभापती रिसोड सुभाष खरात, सुनिल शेंडगे, आमोल नागरे, पंकज पाध्ये, गजानन इंगळे ग्रा प सदस्य, भारत इंगळे माजी प स सदस्य, वसिम पठान युवा मो तालुका उपाध्यक्ष, प्रल्हाद आंधळे, तसेच महीला प्रदेश सचिव नाईक ताई, मा. नगरसेवक वाशीम कल्ले ताई, छाया पवार, प्रांजली पाध्ये महिला जिल्हा उपाध्यक्ष, अनिता शर्मा महीला शहर अध्यक्ष अलका मगर, अध्यक्ष, सुनीता गायकवाड, प्रमीला पखाले, ज्योती धनदरे, शारदा पालवे, आशाबाई खोडके, रेखाबाई वानखेडे, कल्पना शेंडगे, नागरे ताई, व सर्व भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन राजू पाटील राजे, तालुका अध्यक्ष सुरेशराव मुढे, प्रदेश सचिव महीला मोर्चा नाईक ताई, प्रांजली पाध्ये याचे लाभले व मान्यवरांच्या हस्ते महिलांना साडी वाटप करण्यात आले संपुर्ण कार्यक्रमांचे संचालन गणेश पाटील कुटे यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

